अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक

लंडन। भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी ग्राउंडस्टाफला मदत केली आहे.

याबद्दल लॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे. यात त्यांनी लॉर्ड्सवरील अर्जुनचा फोटो शेअर केला आहे. तसेच ट्विट केले आहे की “आमच्या ग्राउंडस्टाफला अर्जुनने मदतीचा हात दिला आहे”

अर्जुनने नुकतेच 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तो श्रीलंका दौऱ्यात दोन चारदिवसीय सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला.

परंतू त्याची या दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी संघात निवड झालेली नसल्याने सध्या तो इंग्लंडमध्ये आहे.

यामुळे त्याने इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटीआधी भारतीय फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी सराव दिला आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

त्याचबरोबर अर्जूनने याआधीही सचिनच्या 200 व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात बॉलबॉय म्हणून काम केले होते.

अर्जुन हा ६ फूटांपेक्षा जास्त उंची असून अष्टपैलू खेळाडू आहे. तो मध्यमगती डावखूरा गोलंदाज आहे. तसेच तो खालच्या फळीत डाव्याहाताने फलंदाजी करतो.

लॉर्ड्स मैदानाचे मुख्य ग्राउंड्समनचा निरोप सभारंभ हुकला-

लॉर्ड्स मैदानाचे मुख्य ग्राउंड्समन माइक हंट यांचा हा शेवटचा सामना होता. त्यामुळे लॉर्ड्सवरील सर्व कर्मचाऱ्यांना माइक हंट यांच्या निरोप समारंभाची उत्सुकता लागली होती. मात्र पहिल्या दिवशी पावसाने सर्वांची निराशा केली.

माइक हंट यांनी लॉर्ड्स मैदानाचे मुख्य ग्राउंड्समन म्हणून 1969 साली सुत्रे हाती घेतली होती. लॉर्ड्सवर 49 वर्ष काम केल्यानंतर एमसीसीने त्यांना या सामन्यानंतर पदमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता.

लॉर्ड्सवर झालेले विश्वचषकाचे अंतिम सामने, अनेक अविस्मरनीय कसोटी सामने आणि एकदिवसीय सामन्यांच्या खेळपट्या स्वत: माइक हंट यांनी तयार केल्या आहेत

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते

११ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा