ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी अर्जून तेंडुलकर करतोय इंग्लंडला अशी मदत

लंडन। आज 2019 विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात लॉर्ड्सच्या मैदानात सामना रंगणार आहे. या सामन्याआधी मुंबईचा युवा प्रतिभावान गोलंदाज अर्जून तेंडूलकरने इंग्लंडच्या सराव सत्रात नेटमध्ये गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना मदत केली आहे.

नारंगी टी-शर्ट घालून नेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या अर्जूनवर इंग्लंडचे फिरकी गोलंदाजी मार्गदर्शक आणि पाकिस्तानचे माजी दिग्गज गोलंदाज सक्लेन मुश्ताक लक्ष ठेवून होते.

अर्जूनने इंग्लंडच्या नेटमध्ये गोलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो याआधीही 2015 मध्ये ऍशेश मालिकेदरम्यान इंग्लंडच्या फलंदाजांना सराव देणाऱ्या नेट बॉलर्सच्या(नेटमध्ये गोलंदाजी करणारे गोलंदाज) ग्रुपचा भाग होता. त्यावेळी तो केवळ 15 वर्षांचा होता.

त्याचबरोबर अर्जूनने याआधी भारतीय संघाच्या फलंदाजांनाही नेटमध्ये अनेकदा गोलंदाजी केली आहे. मागीलवर्षी त्याने इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला नेटमध्ये गोलंदाजी केली होती.

19 वर्षीय अर्जूनने मागील आठवड्यात इंग्लंडमध्ये एमसीसी यंग क्रिकेटर्सकडून सरे सेकंड इलेव्हन विरुद्ध खेळताना 11 षटके गोलंदाजी केली होती. यात त्याने 50 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या.

यातील पहिली विकेट त्याने त्याचे दुसरे षटक टाकताना सरेचा सलामीवीर फलंदाज नॅथन टीलीला सुरेख चेंडू टाकत त्रिफळाचीत करत घेतली होती. याचा व्हिडिओही लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या ट्विटरवरुन शेअर करण्यात आला होता.

याबरोबरच मागील महिन्यात अर्जून मुंबई टी20 लीगमध्येही खेळला. या स्पर्धेत त्याने आकाश टायगर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी त्याची भारतीय क्रिकेट बोर्डाची  23 वर्षांखालील वनडे लीगसाठी मुंबईच्या 23 वर्षांखालील संघातही निवड झाली होती.

तसेच त्याने मागील वर्षी श्रीलंका दौऱ्यात 19 वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताविरुद्धच्या सामन्याआधी विंडीजला बसला मोठा धक्का; हा मोठा खेळाडू विश्वचषकातून बाहेर

टीम इंडियाने या गोलंदाजाला घेतले इंग्लंडला बोलावून, घेऊ शकतो भूवनेश्वर कुमारची जागा

एकवेळच्या धोनीच्या सर्वात आवडत्या गोलंदाजाने केले क्रिकेटला अलविदा