…नाहीतर अर्जून तेंडूलकरच करिअर धोक्यात

मुंबई | १९ वर्षाखालील टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्जून तेंडूलकरची विनू मंकड चषकासाठी मुंबईच्या संघात निवड झाली आहे. मुंबई संघाचे नेतृत्व वेदांत मुरकर करणार आहे.

यामुळे ६ आॅक्टोबरपासून गुजरातविरुद्ध सुरु होणाऱ्या विनू मंकड चषकातील मुंबईच्या पहिल्या सामन्यापासून अर्जूनला चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

सध्या एशिया कपमध्ये १९ वर्षाखालील भारतीय संघ मर्यादीत षटकांचे क्रिकेट खेळत आहे. त्यात आधीपासूनच अर्जूनचा समावेश नव्हता. तसेच त्याने वयाची १९ वर्षही पुर्ण केल्यामुळे त्याला या प्रकारच्या कसोटी सामन्यांतही यापुढे स्थान मिळणार नाही. सध्या अर्जूनचे वय १९ वर्ष आणि ८ दिवस आहे. त्यामुळे २०२० मध्ये होणारा १९ वर्षाखालील विश्वचषकही त्याला खेळता येणार नाही.

त्यामुळे यापुढे अर्जूनला या स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळविण्याची नामी संधी चालुन आली आहे.

जूलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दोन ४ दिवसीय कसोटी मालिकेत अर्जूनला केवळ तीन विकेट घेता आल्या होत्या.

मुंबई या स्पर्धेत गुजरात (६ आॅक्टोबर), बंगाल (७ आॅक्टोबर), मध्यप्रदेश (९ आॅक्टोबर), कर्नाटक (१२ आॅक्टोबर), आसाम (१६ आॅक्टोबर), महाराष्ट्र (१८ आॅक्टोबर), झारखंड (२० आॅक्टोबर) आणि उत्तर प्रदेश (२२ आॅक्टोबर) असे सामने खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी

करुण नायरला संघात संधी न दिल्याने हरभजन सिंगची निवड समितीवर कठोर शब्दात टिका