युवा क्रिकेटर अर्जून तेंडूलकरसाठी ही आहे मोठी न्यूज, झाली या संघात निवड

मुंबई | मुंबईचा युवा प्रतिभावान गोलंदाज अर्जून तेंडूलकरची मुंबईच्या अंडर-२३ संघात निवड झाली आहे. १४ फेब्रुवारीपासून भारतीय क्रिकेट बोर्डाची अंडर २३ ची वनडे लीग जयपुर येथे सुरुवात होत आहे. या मालिकेत अर्जून मुंबईचा कर्णधार जय बिस्तच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. 

मुंबई क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. अर्जून तेंडूलकरने डीवाय पाटील टी२० कप तसेच आरएफएस ताल्यरखान मेमोरियल इन्वीटेशलन स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. याचेच फळ त्याला मिळाल्याचे बोलले जात आहे.

मुंबई अंडर २३ संघाचे प्रशिक्षक अमित पागनीस यांनी अष्टपैलू खेळाडू अर्जून तेंडूलकरचं जोरदार कौतूक केलं आहे. अर्जूनमध्ये यार्कर, बाऊंसर तसेच स्लोअर्स टाकण्याची क्षमता आहे असे यावेळी ते म्हणाले.

अर्जूनने केसी महिंद्रा शिल्ड स्पर्धेत विजय मर्चंट ११ संघाकडून खेळाताना विजय मांजरेकर संघाविरुद्ध र७० धावा देत ६ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने २०१७-१८ हंगामात कूच बिहारी अंडर १९ स्पर्धेत ५ सामन्यात १९ विकेट्स घेतल्या होत्या.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यात त्याने भारतीय गोलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी केली होती.

अशी आहे मुंबई अंडर-२३टीम: जय बिश्त (कर्णधार), हार्दिक तोमरे (विकेटकिपर), सुवेद पार्कर, चिन्मय सुतार, सिद्धार्थ अक्रे, कर्श कोठारी, तनुष कोटियान, अकिब कुरैशी, अंजदीप लाड, क्रुतिक हानागवडी, आकाश आनंद, अमन खान, अथर्व अंकोलेकर, अर्जुन तेंडुलकर, साईराज पाटिल.

महत्त्वाच्या बातम्या- 

असा राखला माहीने भारतीय ध्वजाचा मान, पहा व्हिडीओ

हार्दिक पंड्याची जर्सी रोहित शर्माला फिट तरी कशी बसते?

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके

आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच

…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा