जेव्हा अर्जुन तेंडुलकर बनतो विक्रेता

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन रेडिओ विक्रेता झाला आहे.

तो शनिवारी(11 आॅगस्ट) लॉर्ड्स मैदानाच्या बाहेर रेडिओ विकत आहे. तसेच त्याला यासाठी ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

याबद्दलची माहिती भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने ट्विटरवरुन दिली आहे. हरभजनने अर्जुन रेडिओ विकत असताना त्याच्याबरोबरचा फोटो ट्विटरला शेअर केला आहे.

तसेच हरभजनने ट्विट केले आहे की “पहा कोण रेडिओ विकत आहे. 50 रेडिओ तर आधीच संपले आहेत. खुप थोडे बाकी आहेत. त्यामुळे घाई करा.”

त्याचबरोबर हरभजनने या ट्विटमध्ये अर्जूनला ज्यूनियर सचिन संबोधले आहे.

अर्जुनने नुकतेच 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तो श्रीलंका दौऱ्यात दोन चारदिवसीय सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला.

परंतू त्याची या दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी संघात निवड झालेली नसल्याने सध्या तो इंग्लंडमध्ये आहे.

यामुळे त्याने इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटीआधी भारतीय फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी सराव दिला होता. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

तसेच त्याने या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सतत पावसाचा व्यत्यय येत असल्याने ग्राउंड्सस्टाफलाही मदत केली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

लॉर्ड्स कसोटीः भारतीय गोलंदाजांची कमाल, इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला खिंडार

२० वर्षीय खेळाडूने केले लाॅर्ड्सवर कसोटी पदार्पण, चौकार मारत घेतली पहिलीच धाव

विजयपेक्षा चांगलं खेळूनही शिखर धवनला कायमच ‘बळीचा बकरा’ केलं जात