अर्जून तेंडुलकर चमकला, मुंबईसाठी घेतल्या ५ विकेट्स

भारताचा दिग्गज फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जूनने आज (6 आॅक्टोबर) विनू मांकड 19 वर्षांखालील स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी करत 5 विकेट मिळवले आहेत.

त्याच्या या कामगिरीमुळे मुंबई गुजरातचा डाव 49.2 षटकात142 धावांवरच संपुष्टात आणला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला अचूक ठरवत अर्जूनने 30 धावांत 5 विकेट घेण्याची कामगिरी केली.

अर्जूनने या सामन्यात 8.2 षटके गोलंदाजी केली. यातील एक षटक त्याने निर्धाव टाकले होते. त्याने गुजरात संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले होते. अर्जूनने गुजरातचे पहिले तीन फलंदाज आणि शेवटचे दोन फलंदाजांना बाद केले.

यात त्याने पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गुजरातचा सलामीवीर फलंदाज वर्धमान दत्तेश शहाला शून्य धावेवर बाद केले. तर नंतर एलएम कोचर आणि प्रियेश या दोघांनाही लवकर बाद केले. त्यामुळे गुजरातने 7 षटकातच 16 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या.

यानंतर गुजरातकडून उमंगने 51 धावा करत गुजरातला 142 धावांचा टप्पा गाठून दिला आहे. तर मुंबईकडून अर्जून व्यतिरिक्त अथर्व पुजारी, अथर्व अंकोलेकर, सुवेद पारकर, दिव्यांश आणि आकाश शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

अर्जूनला या स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळविण्याची नामी संधी चालुन आली आहे आणि त्यानेही या संधीचे पहिल्याच सामन्यात सोने केले आहे.

अर्जूनची याआधी 19 वर्षाखालील भारतीय संघाने जुलै महिन्यात केलेल्या श्रीलंका दौऱ्यात 2 चार दिवसीय सामन्यांसाठी निवड झाली होती. या मालिकेत त्याने केवळ तीन विकेट घेता आल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

पदार्पणाच्या सामन्यातच १८ वर्षीय पृथ्वी शाॅला सामनावीर पुरस्कार

कुलदीप यादवचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कहर कारनामा

-टाॅप ५- उद्यापासून सुरु हेत असलेल्या प्रो-कबड्डीमधील मजेशीर आकडेवारी