पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम २०१९: किंग खलील, ऍरोफील्ड यांनी शनिवारचा दिवस गाजवला

पुणे। पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत सर्वात फेव्हरेट घोडा असलेल्या किंग खलील या घोड्याने 1000मीटर अंतरावरच्या द डॉ एस आर कॅप्टन ट्रॉफी क्लास II या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. तर, द जमशेद दलाल ट्रॉफी क्लास IV या महत्वाच्या लढतीत ऍरोफील्ड या घोड्याने विजेतेपद मिळवले.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी द जमशेद दलाल ट्रॉफी क्लास IV या महत्वाच्या लढतीत मंजिरी हॉर्स ब्रीडर्स फार्म प्रायव्हेट लिमिटेडचे पॅलोन मिस्त्री, डीटी रेसिंग अँड ब्रीडर्स एलएलपीचे डिआर ठाकेर आणि विक्रम शहा व एस.आर.सणस यांच्या मालकीच्या ऍरोफील्ड या घोडयाने लक्षवेधी कामगिरी 1मिनिट 40 सेकंद वेळ नोंदवून विजेतेपद पटकावले. याचा पी. त्रेवोर हा जॉकी होता आणि पी श्रॉफ हा ट्रेनर होता.

दुसऱ्या महत्वाच्या 1000मीटर अंतरावरच्या द डॉ एस आर कॅप्टन ट्रॉफी क्लास II या मुख्य शर्यतीमध्ये बी इ सलढाणा, कुशलजीत सिंग जुनेजा आणि विवेक जय यांच्या मालकीच्या किंग खलील या घोड्याने उत्कृष्ट कामगिरी करत 57सेकंद व 546 मिनिसेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. याचा यश नारेदू हा जॉकी होता आणि दीपेश नारेदू हा ट्रेनर होता.

पुणे रेसिंग हंगामातील पुढील रेस शनिवार, 3 ऑगस्ट या दिवशी होणार आहे.

सविस्तर निकाल:
द जमशेद दलाल ट्रॉफी क्लास IV
विजेता: ऍरोफील्ड, उपविजेता: ऍस्टाउंडिंग बे;

द क्लासीक टॉक प्लेट टर्मस
विजेता:ससक्वा, उपविजेता: ब्लेझिंग बे;

द डॉ एस आर कॅप्टन ट्रॉफी क्लास II
विजेता: किंग खलील, उपविजेता: बेशिकताश;

द इस्माईल खान प्लेट क्लास V
विजेता: ऍक्वेरियस, उपविजेता: रिटेन्ड असेट;

द हॉक बे प्लेट डिव्हिजन II
विजेता: नमक्वा , उपविजेता: रॉयस्टन रॉक

द ऍली कॅट प्लेट क्लास III
विजेता:इंटेन्स स्टायलिस्ट, उपविजेता: साफदर;

द हॉक बे प्लेट डिव्हिजन I
विजेता: गोल्डन क्वेस्ट, उपविजेता: ऍडिली