स्वत:ची बातमी स्वत:च पेपरमध्ये लिहीणार कोण आहे तो खेळाडू

आपल्या कामाबरोबरच आपली आवड जपणाऱ्या व्यक्ती खूप क्वचित आढळतात. अनेकदा कामाच्या व्यापामुळे आपली आवड मागे पडते, पण अरुणाचल प्रदेशचा वेगवान गोलंदाज संदीप कुमार ठाकूर मात्र याला अपवाद आहे.

तो व्यवसायाने पत्रकार असला तरी क्रिकेटची आवडही जपत आहे. त्याने याचवर्षी अरुणाचल प्रदेशच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 25 वर्षीय संदीपने अरुणाचल प्रदेशकडून पाच सामन्यात आठ विकेट घेण्याचीही कामगिरी केली.

तसेच त्याची सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतही अरुणाचल प्रदेशच्या संघात निवड झाली आहे.

त्याची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी झाली नसली तरी मात्र वर्तमानपत्रातील बातमीमध्ये त्याचे नाव प्रथम लिहीले जात होते. कारण तो झालेल्या सामन्याचे वार्तांकनही काम करत असलेल्या वृत्तपत्रासाठी लिहीतो. त्याने लिहीलेली बातमी अनेकदा त्याच्या बायलाइनसह येते.

संदीप अरुणाचल प्रदेशमधील अरुणाचल फ्रंट या वृत्तापत्रासाठी काम करतो. त्यामुळे तो ज्या सामन्यात खेळतो, त्याचा रिपोर्ट तो या वृत्तपत्राला पाठवतो.

संदीपने आत्तापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये 5 अ दर्जाचे सामने खेळले आहेत. हे पाचही सामने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील होते. त्याने या स्पर्धेतील उत्तराखंड विरुद्ध खेळताना अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

या स्पर्धेतील त्याची नागालँड विरुद्ध सर्वोत्तम कामगिरी झाली होती. त्याने या सामन्यात 52 धावांत 3 विकेट घेतल्या होत्या.

याआधी माजी हॉकीपटू मोहम्मद शाहिदही खेळत असताना अनेकदा लेख लिहायचे. त्यांची ड्रिबलिंग किंग म्हणून ओळख होती. त्यांचे 2016 मध्ये निधन झाले.

महत्त्वाच्या बातम्या:

विराटला रोहितच ठरतोय सरस.. जाणुन घ्या काय आहे कारण

टीम इंडियासोबतचे ते प्रकरण सायमंड्सला चांगलेच भोवले… झाला व्यसनी

ISL 2018: चेन्नईला पहिल्या विजयाची आशा

Video: जेव्हा धोनीच्या मस्करीमुळे घाबरतो ‘हिटमॅन’ रोहित शर्मा