बुमराहचे मोठे वक्तव्य, असे असेल तर आम्हाला क्रिकेट खेळायचा अधिकार नाही

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत जोरदार पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच संघ पहिल्या कसोटीत केलेल्या चुका पुन्हा करणार नाही असेही भाष्य केले आहे.

“एक सामना पराभूत झाल्यामुळे आमचा विश्वास कमी झालेला नाही. असेल तर आम्हाला क्रिकेट खेळायचा काहीएक अधिकार नाही. असं अजिबात नाही की कोणत्या एका खेळाडूची चूक होती. ” असे बुमराह म्हणाला.

“माझ्यासाठी पदार्पणचा सामना चांगला राहिला. मला खूप काही शिकायला मिळाले. मी पहिल्यांदाच आफ्रिकेत खेळत होतो. परंतु आता आमचे लक्ष दुसऱ्या कसोटी सामन्यावर लागले आहे. ” असेही तो पुढे म्हणाला.