जखमी अक्सर पटेलच्या जागी रवींद्र जडेजा भारतीय संघात

चेन्नई । ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत ५वनडे सामन्यातील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंधेला भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. अक्सर पटेल पहिल्या तीन सामन्यातून बाहेर पडला आहे.

अक्सर पटेलच्या जागी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला पाचारण करण्यात आले आहे. सरावादरम्यान आज अक्सर पटेल जखमी झाला. शिखर धवन पाठोपाठ पहिल्या तीन सामन्यातून बाहेर पडणारा अक्सर दुसरा खेळाडू ठरला आहे.

जडेजाला या मालिकेत विश्रांतीच्या नावाखाली संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्याने श्रीलंका मालिकेतही भाग घेतला नव्हता. ऑस्टेलिया मालिकेत संधी न मिळाल्यामुळे त्याने ट्विटरवर रोष व्यक्त केला होता. परंतु काही वेळाने त्याने तो ट्विट डिलिट केला होता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला डे-नाईट वनडे सामना उद्या चेन्नई येथे खेळवला जाणार आहे.