विकिपीडियावरही अनुष्का विराटाचे शुभमंगल सावधान

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या बातमीची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते. पण फिल्मफेअरनुसार त्यांचे लग्न ९ डिसेंबरलाच झाले असल्याचे समजते.

अनुष्का आणि विराटने इटलीतील मिलान शहरात त्यांचे लग्न केल्याची बातमी आहे. या सेलिब्रेटी जोडीच्या लग्नाची चर्चा जेव्हा विराटने श्रीलंका विरुद्धच्या वनडे आणि टी २० मालिकेतून विश्रांती घेतली होती, तेव्हापासून रंगली आहे.

आता कुणीतरी अनुष्काने विराटशी २०१७मध्ये लग्न केल्याचे विकिपीडिया या जगप्रसिद्ध वेबसाईटवरही टाकले आहे. अनुष्काच्या विकिपीडिया प्रोफाइलवर Spouse(s) या विभागात Virat Kohli (m. 2017) असे लिहिण्यात आले आहे.

विशेष म्हणजे Personal life and off-screen work या सेक्शनमध्ये Sharma is in a relationship with cricketer Virat Kohli. Their relationship has attracted substantial media coverage in India, though she is reluctant to openly talk about it.They married on 11 December 2017.असे लिहण्यात आले आहे.

विकिपीडियावर कोणतीही माहिती देताना त्याचे संदर्भ द्यावे लागतात. त्यात ट्रिब्युन या वृत्तपत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. माहिती देताना विकिपीडियावर कोणताही वापरकर्ता कोणतीही माहिती लिहू शकतो तसेच कोणत्याही व्यक्तीचे प्रोफाइल अपडेट करू शकतो.