आणि शेवटी कूकने धावांचा दुष्काळ संपवला

ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर ऍलिस्टर कुकने दणदणीत शतकी खेळी करत धावांचा दुष्काळ संपवला.

गेले ऑगस्ट २०१७पासून कोणतीही चमकदार कामगिरी न केलेल्या कूकने पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेण्यास मदत केली आहे.

या काळात ह्या खेळाडूने केलेल्या कामगिरीची काही आकडेवारी-

-कूकचे हे ३२वे कसोटी शतक आहे. इंग्लडकडून शतक केलेल्या खेळाडूंमध्ये अव्वल असून दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या हॅमॉन्डपेक्षा तब्बल ९ शतके जास्त आहेत.

-यापूर्वी सलग १० डावात कूकला शतकी खेळी करण्यात अपयश आले होते. त्याने शेवटचे शतक किंवा अर्धशतक हे विंडीजविरुद्ध ऑगस्ट महिन्यात केले होते.

-कूकचे हे ऍशेस मालिकेतील २०११ नंतर पहिलेच शतक आहे.

-कूकने या मालिकेत पहिल्या ६ डावात ८३ धावा केल्या असून आज एकाच डावात त्याने १०४ धावा केल्या आहेत.

-सुनील गावसकर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियामधील ५ मुख्य मैदानावर शतकी खेळी करणारा कूक केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.

-या खेळीमुळे कूक कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ८वा आला असून त्याने माहेला जयवर्धनेला मागे टाकले आहे तर त्याच्या पुढे ७व्या स्थानावर विंडीजचा शिवनारायण चंद्रपॉल असून तो ५२ धावांनी पुढे आहे.