असं काहीतरी करा, सौरव गांगुलीचे जगातील संघांना चॅलेंज

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या इंग्लंडमध्ये ऍशेस मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना रविवारी(18 ऑगस्ट) अनिर्णित राहिला. या मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने केलेल्या शानदार खेळाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली प्रभावित झाला आहे.

गांगुलीने त्यांच्या खेळाच्या गुणवत्तेचे कौतुक करणारे ट्विट केले असून आता अन्य संघांनाही कसोटीत त्यांचा स्तर उंचवण्याचे आव्हान असल्याचे म्हटले आहे.

त्याने ट्विट केले आहे की ‘ऍशेस मालिकेने कसोटी क्रिकेटला जिवंत ठेवले आहे. आता अन्य संघांना त्यांचा स्तर उंचवायचा आहे.’

या ऍशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. पण पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियावर दडपण आणले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. त्यामुळे 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया 1-0 अशा फरकाने अघाडीवर आहे.

या ऍशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना 22 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जाणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पुढच्या वनडे मालिकेत हा खेळाडू खेळणार चौथ्या क्रमांकावर, शास्त्रींचा मोठा खुलासा

आता विराट कोहलीही मारणार विराट कोहली स्टॅंडमध्ये षटकार

टीम इंडियाला विंडीजमध्ये धोका, हल्ल्याच्या मेलमुळे टेन्शन वाढले