नेहराजींनी मांडले मैदानावरच ठाण

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (10 आॅगस्ट) सतत पावसाचा व्यत्यय येत होता. 

त्यामुळे या सामन्यात असाच एकदा पावसाचा व्यत्यय आला असताना भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा चक्क मैदानावर मांडी घालून बसला होता. यावेळी त्याने पायातील बुटही काढून ठेवले होते.

नेहरा बरोबरच समालोचक हर्षा भोगलेही त्याच्याशी गप्पा मारत मैदानातच मांडी घालून बसले होते. हे दोघेही या सामन्यात समालोचन करत आहेत.

नेहरा हा नेहमीच त्याच्या साध्या आणि विनोदी स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचे संघसहकारीही अनेकदा त्याच्या विनोदी स्वभावाचे किस्से सांगतात.

नेहराने भारताकडून खेळताना 17 कसोटी सामन्यात 44 विकेट्स आणि वनडेत 120 सामन्यात 157 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 27 टी20 सामन्यात 34 विकेट्स घेतल्या असुन त्याने 1 नोव्हेंबर 2017 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 35.2 षटकात सर्वबाद 107 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

पुरूषांच्या सामन्यात महिला फोटोग्राफरला नाकारला प्रवेश, थेट इमारतीच्या छतावरुन केले फोटोशूट

एशियन गेम्समध्ये भारतीय चमूचा ध्वजधारक २० वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्रा

लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते