एवढं मोठं भाग्य लाभलेला नेहरा केवळ दुसरा खेळाडू !

दिल्ली । क्रिकेटच्या प्रत्येक मैदानावर गोलंदाजी ज्या बाजूने होते त्याला एन्ड असे म्हटले जाते. त्याला वेगवेगळी नावे असतात. परंतु आपल्याच नावाच्या एन्ड करून गोलंदाजी करणे हे केवढं भाग्य असून शकत.

आशिष नेहराला हे भाग्य मिळालं आहे. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावरील आंबेडकर स्टेडियम एन्डचे नाव बदलून परवा आशिष नेहरा एन्ड असे करण्यात आले.

विशेष म्हणजे त्याच एन्ड करून काल नेहराने गोलंदाजी करून आपल्या आतंरराष्ट्रीय कारकिर्दीचा एन्ड अर्थात निरोप घेतला.

यापूर्वी याच वर्षी ३ ऑगस्ट रोजी लाँकशायर क्रिकेट क्लबने ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमच्या पॅव्हेलियन एन्डचे नाव बदलून द जेम्स अँडरसन एन्ड असे नाव दिले होते. तर ४ ऑगस्ट रोजी अँडरसनने या बाजूने गोलंदाजीही केली होती. विशेष म्हणजे या सामन्यात त्याने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ३ अशा एकूण ७ विकेट्स घेतल्या होत्या.