आशिष नेहराच्या कारकिर्दीची संपूर्ण आकडेवारी

– आशिष नेहरा १८ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. १९९९ साली नेहराने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

– नेहराने १७ कसोटी सामन्यात ४४ विकेट्स घेतल्या.

-नेहरा भारताकडून १२० वनडे सामने खेळला. त्यात त्याने १५७ विकेट्स घेतल्या.

– आशिष नेहराने २००३च्या विश्वचषकात २३ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

-नेहराने भारताकडून २६ टी२० सामने खेळले. त्यात त्याने ३४ विकेट्स घेतल्या.

-वेगवेगळ्या लीग ट्वेंटी ट्वेंटी आणि टी२० मिळून नेहरा १३१ सामने खेळला. ज्यात त्याने २विकेट्स घेतल्या.

-नेहराने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण २३५ विकेट्स घेतल्या आहेत.