अष्टपैलू दिवाळी अंकाचे शिवाजी पार्कवर शानदार प्रकाशन

मुंबई | क्रीडाविषयाला वाहिलेल्या अष्टपैलू दिवाळी अंकाचे प्रकाशन मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव नामदेव शिरगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.

दादर येथील शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावर खेळाडूंच्या साक्षीने क्रीडामय वातावरणात नवव्या अष्टपैलू दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. यावेळी डोर्फ केटल कंपनीचे सीएसआर प्रमुख संतोष जगधने, अंकाचे संपादक क्रीडालेखक संजय दुधाणे उपस्थित होते.

भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे क्रीयाशील सहसचिव यांनी प्रा. संजय दुधाणे यांंच्या क्रीडा प्रचार व प्रसार कार्याचे कौतुक करीत म्हणाले की, दुधाणे यांनी माझी भेट सर्वप्रथम लंडन ऑलिम्पिकमध्ये झाली. तेव्हापासून त्यांच्या क्रीडालेखना बाबतची तळमळ मी पहात आहे. मराठी क्रीडाविश्वासाठी अनेक क्रीडा पुस्तके लिहिणारे दुधाणे यांनी क्रीडाविषयक दिवाळी अंक सलग 9 वर्ष संपादित करीत आहेत. या भूषणीय बाब आहे.

डोर्फ केटल कंपनीचे संतोष जगधने म्हणाले की, दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत अष्टपैलू हा लक्षवेधी अंक आहे. क्रीडाक्षेत्राच्या प्रगतीसाठी चांगले विचारमंथन करण्याचा दुधाणे यांचा प्रयास हा कौतुकास प्राप्त आहे.

सलग नवव्या वर्षी क्रीडालेखक संजय दुधाणे यांनी क्रीडा विषयाला वाहिलेला अष्टपैलू दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे धाडस यशस्वी केले आहे. दिवाळी अंक म्हटलं की क्रीडाकथा, प्रेरक लेख यांचा वाचनीय फराळ असतो. नावाप्रमाणेच आठ पैलूत या अंकाची मैफिल पहिल्या पानापासून रंगली आहे.

परिपूर्ण असा क्रीडाविषयक दिवाळी अंकात क्रीडा साहित्य बरोबरच ललित साहित्याचे जोड दिली आहे. जकार्ता आशियाई स्पर्धातील सुवर्णपदक विजेत्यांचे आकर्षक मुखपृष्ठावरूनच या अंक क्रीडाविषयक वाचनीय पर्वणी असल्याचा प्रत्यय येत आहे. यासह ऑलिम्पिक, क्रिकेट, भारतीय खेळ, क्रीडा प्रेरणा या विषयावरील लेख वाचनीय झाले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या क्रीडाकथेने सुरू होणार्‍या या अंकात शेवटच्या पानावरपर्यंत वाचनीय अक्षर फराळाचा आनंद मिळतो.

वेदांत पब्लिसिटीने प्रकाशित केलेला अष्टपैलू दिवाळी अंक हा 80 पानांचा असून 100 रूपये त्याचे मूल्य आहे.

अष्टपैलू दिवाळी अंक
संपादक – प्रा. संजय दुधाणे
प्रकाशक – वेदांत पब्लिसिटी
पृष्ठे – 80
मूल्य – रू. 100
वितरक –
महाराष्ट- पूनम एजन्सी, 020-24494668, 64199472
महाराष्ट- संदेश एजन्सी, 020-24459361,66021340
पुणे- रसिक साहित्य -अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा दालन -बाजीराव रोड, उत्कर्ष बुक डेपो – डेक्कन जिमखाना
मुंबई- बी. डी. बागवे अँड कंपनी, गिरगांव 7506000869, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, गिरगांव

महत्त्वाच्या बातम्या:

धमाकेदार शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचे ५ धमाकेदार विक्रम

शतकवीर रोहित शर्माने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा बनला जगातील पहिलाच खेळाडू

रोहित शर्माचा टी२०मध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा कारनामा़

गौतम गंभीरचा आजपर्यंतचा सर्वात गंभीर निर्णय, सोडले या संघाचे कर्णधारपद