आर. अश्विन यो यो टेस्ट पास

बेंगळुरू । भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आज यो-यो टेस्ट पास झाला आहे. त्याने स्वतःच याबद्दल आपल्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे.

आर अश्विन सध्या तामिळनाडू संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करत आहे.

भारतीय संघात आजकाल निवड होण्यासाठी कौशल्य ही तर महत्वाची गोष्ट आहेच परंतु फिटनेससुद्धा तेवढाच महत्वाचा घटक मानला जातो. त्यासाठी यो-यो टेस्ट पास होणे गरजेचे आहे. अश्विन जून महिन्यात शेवटचा वनडे सामना खेळला असून त्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

आर अश्विनने हा ट्विट करून एकप्रकारे आपण न्यूजीलँड मालिकेत खेळण्यासाठी तयार असलयाचे सांगितले आहे. न्यूजीलँड विरुद्धची मालिका २२ ऑक्टोबरपासून सुरु होत असून त्यात अश्विनचा समावेश होईल किंवा नाही याबद्दल शंका आहे.

१४ ऑक्टोबर पासून तामिळनाडूचा दुसरा कसोटी सामना त्रिपुरा बरोबर होणार आहे. आर अश्विन यात भाग घेणार आहे.