कसोटी कारकिर्दीत अश्विनची ५०० तर जडेजाची ४०० निर्धाव षटके

कोलंबो: भारताची अष्टपैलू जोडी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे आयसीसी कसोटी क्रमवारीत अनुक्रमे दुसऱ्या आणि पहिल्या स्थानावर आहेत हे आता सर्वानांच माहित आहे परंतु या जोडीने श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात असा काही करिष्मा केला आहे की ज्यामुळे त्यांच्या नावावर दोन खास विक्रम जोडले गेले आहेत.

आज या दोंन्ही खेळाडूंनी जबदस्त अर्धशकते करून भारतीय संघाला ६०० धावांचा आकडा पार करण्यासाठी मदत केली. परंतु याच सामन्यात त्यांनी कारकिर्दीतील ५०० (अश्विन) , जडेजा (४००) वी निर्धाव षटके टाकली आहेत.

या दोंन्ही खेळाडूंची कारकीर्द बऱ्यापैकी समांतर चालू असल्याचं हे एक चांगलं लक्षण आहे.

थोडस माहितीसाठी:

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक निर्धाव षटक टाकण्याचा विश्वविक्रम हा श्रीलंकेचा माजी दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याच्या नावावर आहे. त्याने तब्बल १७९४ षटके निर्धाव अर्थात मेडन ओव्हर्स टाकल्या आहेत.

त्यानंतर शेन वॉर्न (१७६१), अनिल कुंबळे (१५७६), ग्लेन मॅकग्रा (१४७०), लान्स गिब्स (१३१३), डेरेक अंडरवूड (१२३९), शॉन पोलॉक (१२२२), डॅनियल व्हिटोरी (११९७), कार्टानी वॉल्श (११४४) आणि बिशनसिंग बेदी (१०९६) यांचा नंबर लागतो.