आणि ट्विटरवर अश्विनचे झाले हसू !

रविचंद्रन अश्विनने रेडमी फोनसाठी प्रचारात्मक ट्विट पोस्ट केले आणि स्वतःचे हसू करून घेतले. जवळपास सर्व प्रमुख क्रिकेटपटू ज्यांना सोशल मीडियावर खूप जास्त फॉलोवर्स आहेत ते सर्वजण अधून मधून असे वेगवेगळ्या ब्रॅण्डसाठी प्रमोशनल ट्विट टाकत असतात.

चाहते एकतर ह्या ट्विटकडे दुर्लक्ष करतात किंवा त्या खेळाडूला अशी कृती परत करू नये म्हणून ट्रोल करतात. भारताचा अश्विनही यातून सुटला नाही. चाहत्यांनी अश्विनचे हे ट्विट सकारात्मक रित्या घेतले नाही आणि त्याची चेष्ठा करण्यास सुरुवात केली.

भारताच्या या स्टार ऑफस्पिनरने ट्विट केले की, ‘माझ्या कॅरम बॉल समजून घेण्यावर अनेकदा वादविवाद चालू आहे, परंतु काही गोष्टी आहेत #कि ज्यात डिबेट नाही! रेडमी नोट ४: भारतातील नंबर १ चा विकला जाणारा स्मार्टफोन. ”

आता त्याने तो ट्विट डिलीट केलेला आहे.

मग काय ट्विटर वरील त्याच्या चाहत्यांनी या गोष्टीवरून खूप चेष्टा केली आणि खूप ट्विट्स ही केले.पाहुयात काय आहेत ते ट्विट्स.