एशिया कप २०१८साठी अशी समालोचकांची टीम

शनिवारी 15 सप्टेंबरपासून एशिया कप 2018 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी आपले संघ जाहिर केले आहेत. त्यामुळे आता या स्पर्धेसाठी समालोचकांचीही नावे स्पष्ट झाली आहेत.

या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे सहा देश सहभागी होणार आहेत. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार या सहभागी होणाऱ्या देशांच्या समालोचकांना स्पर्धेसाठी पहिली पसंती मिळाली आहे.

यात भारताचे सुनील गावस्कर, एल शिवरामकृष्णन आणि व्हिव्हिएस लक्ष्मण हे असणार आहे. तसेच जर लक्ष्मण उपलब्ध नसेल तर झहीर खान समालोचन करेल.

तसेच यात पाकिस्तानचे रमीज राजा, आमेर सोहेल तर श्रीलंकेचे कुमार संगकारा आणि आंद्रे रसल हे समालोचन करतील. त्याचबरोबर अफगाणिस्तानचे माजी प्रशिक्षक डिन जोन्स, बांगलादेशचे अथर अली खान यांचेही समालोचकांच्या यादीत नाव आहे.

याबरोबरच ब्रेट ली आणि केविन पीटरसन देखील एशिया कप स्पर्धेत समालोचन करताना दिसणार आहेत. असे असले तरी संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले यांचे मात्र या समालोचकांच्या यादीत नाव नाही.

या स्पर्धेचा पहिला सामना हा श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असा होणार आहे. तसेच भारताचे साखळी फेरीतील सामने 18 आणि 19 सप्टेंबरला अनुक्रमे हाँगकाँग आणि पाकिस्तानशी होणार आहेत.

या स्पर्धेत अ गटात भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग हे संघ खेळतील, तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.

दोन्ही संघातील प्रत्येकी अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर 28 सप्टेंबरला दुबईत या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अर्धशतक हुकले तरी असा मोठा पराक्रम करणारा विराट कोहली बनला चौथाच भारतीय

जेम्स अँडरसन ठरला टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी सर्वात धोकादायक गोलंदाज

युएस ओपन: नोवाक जोकोविचला दिग्गज टेनिसपटू पीट सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी