एशिया कपमध्ये गतविजेत्या टीम इंडियाला अन्य संघापेक्षा मिळणार विशेष वागणुक

15 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु होणाऱ्या एशिया कप 2018 स्पर्धेमध्ये भारतीय संघाला विशेष वागणुक दिली जाणार आहे.

भारतीय संघ या स्पर्धेसाठी उशीरा म्हणजेच 18 सप्टेंबरला दाखल होणार आहे. तोपर्यंत श्रीलंका संघाचे साखळी फेरीतील दोन्ही सामने झालेले असतील.

तसेच मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघ ग्रँड हयात हॉटेलमध्ये राहणार आहे. तर पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग आणि अफगाणिस्तान हे अन्य संघ इंटरकॉन्टिनेंटलमध्ये राहणार आहेत. 

भारतीय संघही आधी अन्य संघांबरोबर इंटरकॉन्टिनेंटलमध्ये राहणार होता. परंतू त्यांचे निवासस्थान अखेरच्या क्षणी बदलण्यात आले. 

त्याचबरोबर भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. मग जरी त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला तरी या स्पर्धेतील दुसरे ठिकाण असलेले अबुधाबी येथेही ते खेळणार नाहीत. तसेच या स्पर्धेतील अंतिम सामनाही 28 सप्टेंबरला दुबईमध्ये होणार आहे.

भारताला विशेष वागणूक देण्याचे कारण असे दिले गेले आहे की भारत या स्पर्धेचा यजमान आहे. ते त्यांना हवे असलेले विशेषाधिकार वापरु शकतात. पण त्याचबरोबर असेही समजले आहे की बीसीसीआयचे कर्मचारी (स्टाफ आणि स्पॉन्सर्स) यांनाही विशेष वागणूक मिळणार आहे.

भारत या स्पर्धेत 18 आणि 19 सप्टेंबरला साखळी फेरीत अनुक्रमे हाँगकाँग आणि पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: मैदानावर ठेका धरणाऱ्या शिखर धवनने भज्जीलाही केले भांगडा करण्यास प्रोत्साहित

कूक आणि टीम इंडियाचे नाते खास…शेवटच्या सामन्यातही मोठा पराक्रम

एबी डिविलियर्स खेळणार पाकिस्तान सुपर लीगमध्ये!