एशिया कप २०१८: भारत विरुद्ध पाकिस्तान – आज चुकीला माफी नाही

भारताचा एशिया कप मधील पहिला सामना अनेकांना संभ्रमात टाकणारा ठरला. हॉंगकॉंग सारख्या नवीन आणि कमी अनुभव असणाऱ्या संघाने भारताची अक्षरशः धूळदाण उडवली.

या विजयामुळे भारताने पुढील फेरीत प्रवेश पक्का केला आहे, तर हाँग काँगचे एशिया कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

आज सायंकाळी 5 वाजता भारत पाकिस्तान यांच्यात दुबईच्या दुबई इंटरनॅशल क्रिकेट स्टेडियमवर उत्कंठावर्धक सामना होणार आहे. हॉंगकॉंग विरूद्धच्या सामन्यात भारताला विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. भारताने या सामन्याकडे पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठीचा सराव म्हणून पाहिले होते. हॉंगकॉंग संघाने कोणालाही कमी लेखू नये याची शिकवण भारतीय संघाला दिली.

भारताने या सामन्यात राजस्थानचा युवा गोलंदाज खलील अहमद याला संधी दिली. त्याने दमदार कामगिरी करत 3 बळी मिळवले. 140 पेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकून संघ व्यवस्थापनाला पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यासाठी त्याचा विचार करायला भाग पाडले आहे. तो नवखा असल्याने त्याच्या गोलंदाजीवर पाकिस्तानचे खेळाडू अडखळू शकतात.

भुवनेश्वर दुखापतीमधून सावरला असला तरी तो त्याच्या लयीत दिसला नाही.

त्याचा फायदा हॉंगकॉंगच्या संघाने खूप घेतला. सलामीवीर फलंदाज निजाकत खान आणि कर्णधार अंशुमन राठने भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले होते. त्यांनी भारताला पहिल्या 30 षटकात एकही विकेट मिळू दिली नव्हती. या दोघांनी अर्धेशतके करताना पहिल्या विकेटसाठी तब्बल 174 धावांची भागीदारी रचली.

फलंदाजीचा विचार करायचा झाल्यास सलामीवीर शिखर धवनने दमदार शतक झळकावले. तर 2 वर्षानंतर वनडे सामना खेळणाऱ्या अंबाती रायडूने 60 धावा करत त्याला सुरेख साथ दिली. शिखर धवन आणि अंबाती रायडूने 116 धावांची शतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला.

रोहीतने चांगल्या सुरुवातीनंतर खराब फटकामारून आपली विकेट गमावली. कर्णधार पदाला साजेशी खेळी करण्यात जरी तो अपयशी ठरला असला तरी त्याच्याकडून पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात संघाला खूप अपेक्षा आहेत.

मधल्या फळीने पुन्हा हाराकीरी केली असून त्यांच्याकडून आजच्या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहेत. अंतिम अकरा मध्ये कोण खेळणार याबद्दल उत्सुकता आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या व मधल्या फळीतील फलंदाज के एल राहुलचे पुनरागमन होऊ शकते. तर भुवनेश्वर कुमार वगळण्याची शक्यता आहे.

 

पाकिस्तान विरुद्ध संभाव्य भारतीय संघ-

 रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उप-कर्णधार), केएल राहुल, अंबाती रायडू,  केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक),  हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आणि  खलील अहमद.

 

महत्त्वाच्या बातम्या-

एशिया कप २०१८: केवळ 16 तासात टीम इंडिया खेळणार दुसरा आंतरराष्ट्रीय सामना

-एशिया कप २०१८: भारताच्या या विक्रमाशी बरोबरी करण्याची पाकिस्तानला संधी

-टॉप ५: शिखर धवनने दमदार शतक करत केले हे खास विक्रम