टॉप ५: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान या विक्रमांकडे असणार लक्ष

दुबई। एशिया कप 2018 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उद्या सामना रंगणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडेल.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा ही 12 वी एशिया कप स्पर्धा आहे. आत्तापर्यंत भारताने या स्पर्धेचे सर्वाधिक 6 वेळा विजेतेपद मिळवले आहे. तर पाकिस्तानने 2 वेळा एशिया कप स्पर्धा जिंकली आहे.

हे दोन संघ शेवटचे 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्यानंतर उद्या जवळ जवळ 1 वर्षांनी ते आमने सामने येणार आहेत.

भारत पाकिस्तान संघात होणाऱ्या सामन्यात या विक्रमांकडे असेल लक्ष-

– भारत आणि पाकिस्तान हे संघ आत्तापर्यंत एशिया कपमध्ये 12 वेळा आमने सामने आले आहेत. यातील 6 सामन्यात भारताने बाजी मारली आहे. तर पाकिस्तानने 5 वेळा भारताविरुद्ध विजय मिळवला आहे. तसेच 1 सामना हा अनिर्णित राहिला आहे.

त्यामुळे पाकिस्तानला भारताविरुद्ध 6 वा विजय मिळवून दोन संघातील विजयाची बरोबरी करण्याची संधी आहे.

– रोहित शर्माला एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध एशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यासाठी 51 धावांची गरज आहे. या यादीत सध्या तो 204 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अव्वल क्रमांकावर 255 धावांसह विराट कोहली आहे.

– रोहितला एशिया कपच्या वनडे प्रकारातही पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याची संधी आहे. त्याला यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. त्याने एशिया कपमध्ये वनडेत 204 धावा केल्या असून या यादीतही 206 धावांसह कोहली अव्वल आहे.

– एमएस धोनीला एशिया कपमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणार यष्टीरक्षक होण्याची संधी आहे. त्याने आत्तापर्यंत एशिया कपमध्ये यष्टीमागे 31 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत 36 विकेटसह कुमार संगकारा अव्वल क्रमांकावर आहे.

– धोनीला पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये दिलीप वेंगसरकरांची बरोबरी करण्याची संधी आहे. त्याने पाकिस्तान विरुद्ध आत्तापर्यंत 46 वनडे सामने खेळले असून वेंगसरकारांनी 47 वनडे सामने खेळले आहेत.

या यादीत वेंगसरकर आठव्या स्थानी आहेत. तर अव्वल क्रमांकावर 87 सामन्यासह सचिन तेंडुलकर आहे.

– पाकिस्तानच्या फकार जामन आणि इमाम उल हकला भागीदारीत 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 122 धावांच्या भागीदारीची गरज आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशिया कप २०१८: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल सर्वकाही…

भारताकडून पदार्पण करत असलेला कोण आहे खलील अहमद

एशिया कप २०१८: भारत विरुद्ध हाँग काँग सामन्याबद्दल सर्वकाही