टीम इंडियात निवड झालेल्या 20 वर्षीय क्रिकेटपटूने मानले राहुल द्रविडचे आभार

आज, 1 सप्टेंबरला आशिया चषकासाठी 16 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात 20 वर्षीय खलिल अहमदलाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याने युवा भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले आहेत.

तसेच त्याने त्याचा आदर्श असलेला झहिर खानप्रमाणे गोलंदाजी करुन भारताला विजय मिळवून देण्याचीही आशा व्यक्त केली आहे.

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना खलिल म्हणाला, जेव्हा त्याला संघात संधी मिळाल्याचे कळाले तेव्हा तो नर्व्हस झाला होता.

तो पुढे म्हणाला, “मला विश्वास बसत नाही की मी भारतीय संघाचा भाग असणार आहे. माझ्यासाठी हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. मी चांगली कामगिरी करत आहे आणि तेच माझे ध्येय आहे. प्रत्येक खेळाडूचे देशासाठी खेळण्याचे स्वप्न असते. मी काही वेगळा नाही.”

“मला द्रविडचे आभार मानायचे आहेत. त्यांनी मला खराब सुरुवातीनंतर आत्मविश्वास असलेला गोलंदाज बनविले.”

“मी त्यांचे फक्त आभार मानू शकत नाही. त्यांनी मी जेव्हा 19 वर्षांखालील क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती तेव्हा माझी निराशाजनक सुरुवात झाली होती. मी त्यात अनेक मुर्खपणाच्या चुका केल्या. पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला आत्मविश्वास मिळाला. त्यांचा माझ्या क्रिकटर म्हणून झालेल्या वाटचालीत मोठा वाटा आहे.”

“द्रविडबद्दल सर्वोत्तम गोष्ट म्हणजे ते तुम्हाला मैदानात जाऊन व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देतात. तसेच त्यांनी मला नवीन गोष्टी करण्यासाठी न घाबरण्याचा सल्ला दिला.”

त्याचबरोबर झहिर खान बद्दल खलिल म्हणाला, “मी झहिर खानला पाहुन मोठा झालो. मला त्याच्यासारखी गोलंदाजी करुन भारताला विजय मिळवून द्यायचा आहे. मी त्याने देशासाठी मिळवलेल्या यशाच्या जवळपासही गेलो तरी माझ्यासाठी मोठी गोष्ट असेल. ”

त्याचा 19 वर्षांखालील संघातील संघसहकारी सध्या भारतीय संघातून खेळत आहे. याबद्दलही खलिल म्हणाला मला आनंद होत आहे.

तसेच तो म्हणाला आयपीएलच्या अनुभवाचाही मोठे सामने खेळण्यासाठी मदत झाले असल्याचेही त्याने सांगितले.

खलिल भारत अ संघाकडूनही नुकताच चौरंगी मालिकेत आणि जून-जुलैमध्ये झालेल्या इंग्लंड दौऱ्यात खेळला आहे.

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ कडून खेळताना या खेळाडूने 5 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दोन दिवसापूर्वी संपलेल्या चौरंगी मालिकेत त्याने 4 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने आत्तापर्यंत 2 प्रथम श्रेणी सामने, 17 अ दर्जाचे सामने, 12 ट्वेंटी२० आणि 1 आयपीएल सामना खेळले आहेत.

तसेच तो 2016 ला 19  वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकातही खेळला होता. यात त्याने 3 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: पाकिस्तानला हरवत भारतीय पुरूष हॉकी संघाने पटकावले कांस्यपदक

एशियन गेम्स: बॉक्सिंगमध्ये अमित पांघलला सुवर्णपदक

एशियन गेम्स: भारताला ब्रिज प्रकारात पुरूष दुहेरीत सुवर्णपदक

‘खो-खो’च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पीयनशिपबद्दल सर्वकाही