रोहित शर्माला मिळाल्या युजवेंद्र चहलकडून बॅटींगच्या टिप्स

इंग्लंडचा दौरा झाल्यावर आता भारत शनिवारीपासून (15 सप्टेंबर) अरब अमिरातीमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये खेळणार आहे. यामध्ये नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली असून रोहित शर्माची प्रभारी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी रोहितने सरावही सुरू केला आहे. सराव करतानाचा व्हिडियो त्याने ‘पुढचे ध्येय आशिया कप’ अशा आशयाचे कॅप्शन देऊन इंन्टाग्रामवर पोस्ट केले आहे. या पोस्टला फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने ‘डिफेन्स नहीं करने का भाऊ उडाने का है’ अशी प्रतिक्रीया दिली आहे.

Photo Courtesy: screengrab/ instagram/ rohitsharma45

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गतविजेत्या भारतीय संघाने नियमीत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली असून शिखर धवन हा उप-कर्णधार आहे. खलील अहमद या नवीन खेळाडूचे संघात पदार्पण होत आहे तर केदार जाधवचाही 16 जणांच्या संघात समावेश आहे.

भारतीय संघ निवडीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले,”कोहलीला इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत पाठीचा त्रास होत असल्याने त्याला आराम दिला आहे.”

“जे खेळाडू क्रिकेटच्या तीनही प्रकारात खेळतात त्यातील काही जणांना विश्रांती देणे आवश्यक आहे. याचा आम्ही इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातच विचार केला होता. याची सुरूवात आम्ही कोहलीपासुन केली.”

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पराभवानंतरही टीम इंडिया अव्वल स्थानी कायम

भारतीय प्रशिक्षक ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून देण्यास असक्षम- विनेश फोगट

हॉकीपटू सरदार सिंगने घेतली आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती