टाॅप ५- भारत विरुद्ध बांगलादेश एशिया कपमधील या आहेत टाॅप खेळी

भारत आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ सलग दुसऱ्यांदा एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांना भीडत आहेत. एशिया कप स्पर्धेत भारताचा माजी महान खेळाडू सचिन तेंडूलकरने आपले 100 शतक एशिया कप स्पर्धेत बांग्लादेशाविरूद्ध केले होते. एका डावात सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव नाही.

भारत आणि बांग्लादेश या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अशिया कप स्पर्धेत एकमेकांच्या विरोधात केलेल्या सर्वोत्तम या पाच खेळ्या करणारे खेळाडू –

1- विराट कोहली- 2014 साली फतुल्ला येथील सामन्यात विराटने 122 चेंडूत 136 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या बळावर भारताने 280 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. विराट आपले कारकीर्दीतील 19 शतक ठोकले होते.

2- सौरव गांगुली- 2000 साली ढाक्यात झालेल्या सामन्यात बांग्लादेशने ठेवलेल्या 250 धावांचा पाठलाग करताना सौरव गांगुलीने 124 चेंडूत 135 धावांची आतषबाजी केली होती. त्याच्या या खेळीच्या बळावर भारताने 8 विकेटने विजय मिळवला होता.

3-मिशफिकूर रहिम- फातुल्ला येथे झालेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रहीमने शानदार शतक करताना 117 धावा कुटल्या होत्या. त्याच्या या खेळीच्या जिवावर बांग्लादेशाने भारतासमोर 280 धावांचे लक्ष ठेवले होते.

4- सुरेश रैना – 2008 ला पाकिस्तानमध्ये झालेल्या एशिया कप स्पर्धेतील कराचीतील सामन्यात सुरेश रैना 107 चेंडूत 116 धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळी दरम्यान 3 षटकार आणि 11 चौकार मारले होते. या सामन्यात भारताने 283 धावांचे आव्हान 43.2 षटके 7 विकेटच्या मोबदल्यात पुर्ण केले होते.

5-अलोक कपाली- कराची येथील सामन्यात बांग्लादेशने अलोक कपालीच्या 115 धावांच्या मदतीने भारतासमोर 283 धावांचे लक्ष ठेवले होते. कपालीने अवघ्या 97 चेंडूचा सामना करत ही खेळी केली होती.  त्याने आपले अर्धशतक 65 चेंडूत पुर्ण केले तर पुढच्या 50 धावा अवघ्या 21 चेंडूत केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

बांगलादेशने कंबर कसली; आकडेवारी मात्र भारताच्या बाजूने

खराब फाॅर्ममध्ये असलेल्या धोनीला गावसकरांचा सल्ला, आधी हे काम कर!

३ तासांत फलंदाजाकडून २३ षटकार आणि १५ चौकारांची बरसात, रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला

मराठमोळा रिशांक देवाडीगा करणार यूपी योद्धाचे नेतृत्व

एशिया कपमधील खराब कामगिरीचा मला बळीचा बकरा बनवले गेले

कोरिया ओपनच्या उपउपांत्यपुर्व सायनाचा धडाक्यात प्रवेश