कोहलीचा असाही एक विक्रम, ज्यासाठी सचिन, द्रविडला खेळावे लागले १० सामने जास्त

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली.

याबरोबर विराटने आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, न्युझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडीजमध्ये शतकी खेळी केली आहे.

त्याने यासाठी केवळ ६७ कसोटी सामने खेळले आहे. हे सर्व कसोटी खेळणारे देश आशिया खंडाबाहेरचे आहेत.

सचिनने हा कारनामा ९३व्या, द्रविडने ७३व्या तर युनिस खानने हा पराक्रम ११५व्या कसोटीत केला.

आशिया खंडातील केवळ ४ खेळाडूंना हा पराक्रम आजपर्यंत करता आलेला आहे. विशेष म्हणजे यातील युनिस खानने हा पराक्रम ११५व्या कसोटीत केला. तसेच तो कारकिर्दीत ११८ सामने खेळला आहे.

विराट ज्या देशांमध्ये कसोटी सामने खेळला आहे त्यातील केवळ बांगलादेशात त्याला शतक करता आले नाही. तर त्याला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि आयर्लंड या देशात तो एकही कसोटी सामना खेळला नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट वादळात फारसा लक्षात न आलेला अश्निनचा हा कारनामा पहाच

जगाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करणारा विराट केवळ चौथा भारतीय

दिग्गज ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाला विराट कोहलीकडून धक्का