एशियन चॅम्पियनशिपमध्ये विजतेपद मिळवत मेरी कोमचे जोरदार पुनरागमन !

एमसी मेरी कोमने एशियन चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. तिने उत्तर कोरियाच्या ह्यांग मी किमला आज झालेल्या या सामन्यात पराभूत करत हा विक्रम केला.

तिचे हे एशियन चॅम्पियनशिपमधील ५वे विजेतेपद आहे. ही स्पर्धा व्हिएतनाम देशात सुरु आहे. मेरी मोठा काळ कोणतीही मोठी स्पर्धा खेळली नव्हती. गेल्या ५ वर्षात प्रथमच तिने तिच्या आवडत्या वजनी गटात अशी कामगिरी केली आहे.

तिने शेवटचे पदक २०१४ साली इंचियोन येथे एशियन गेम्समध्ये जिंकले होते. तेव्हा ५१ किलो वजनी गटात भारताकडून सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली महिला बॉक्सर होती. ३ वर्षांच्या दुष्काळानंतर तिने पुन्हा अशी कामगिरी केली आहे.