एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक

जकार्ता येथे सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये आज भारताला लक्ष्य पुरूषांच्या ट्रॅप शूटींगमध्ये रौप्यपदक मिळवून दिले. हे भारताचे शूटींगमधील तिसरे पदक आहे. तर दुसरीकडे महान शूटर मानवजीत सिंगचे पदक थोडक्यात चुकले. तो चौथ्या क्रमांकावर राहिला.

१९ वर्षीय लक्ष्य पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर तर सिंग अव्वल स्थानावर होता. ही स्पर्धा खूप अटीतटीची होती पण भारतीय शुटर्सनी चांगली कामगिरी केली.

पहिल्या फेरीत लक्ष्यने १५ पैकी १४ शॉटवर नेम सादत उत्तम सुरूवात केली. सिंगला मात्र ११ वरच नेम सादता आला. २५ शॉटनंतर दुसऱ्या स्थानासाठी हे दोघेही २१ गुणांनी बरोबरीत होते. रौप्यपदकासाठी लक्ष्यने ४५ पैकी ३९ शॉट्स मारले.

यावेळी क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर लक्ष्यचे अभिनंदन केले. त्यांनी २००४च्या ऑलिंपिकमध्ये पुरूषांच्या दुहेरी ट्रॅप शूटींगमध्ये रौप्यपदक मिळवले आहे.

या खेळाचे सुवर्णपदक चायनीज तायपीच्या कुनपी यांगने मिळवले. त्याने ५० पैकी ४८ शॉट्स मारले. अशाप्रकारे एशियन गेम्समध्ये भारताने १ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्यपदक मिळवले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

…आणि भारताला पराभूत केल्यावर कोरियन खेळाडू, चाहत्यांना अश्रू अनावर

भारताचा सामना जिंकणे जवळपास पक्के, जाणुन घ्या काय आहे कारण?