बजरंग पुनियाने सुवर्णपदक केले अटल बिहारी वाजपेयींना समर्पित

18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक कुस्तीपटू बजरंग पुनियाने मिळवून दिले. त्याने हे सुवर्णपदक भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयींना समर्पित केले आहे.

वाजपेयी यांचे 93 व्या वर्षी 16 आॅगस्टला दीर्घ आजाराने निधन झाले. ते भारताचे तीन वेळा पंतप्रधान राहिले होते.

बजरंगने तो सुवर्णपदक वाजपेयींना समर्पित करत असल्याबद्दल ट्विटरवर माहिती दिली आहे. त्याने ट्विट केले आहे की, “एशियन गेम्समधील सुवर्णपदक मी स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयींना समर्पित करत आहे.”

बजरंगच्या या निर्णयाबद्दल भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे.

वाजपेयींसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत बोलताना मोदी म्हणाले, “काल, बजरंग पुनिया, जो मला वाटते कधीही वाजपेयींना भेटला नसेल त्याने त्याचे सुवर्णपदक अटलजींना समर्पित केले आहे. मला वाटते वाजपेयींच्या व्यक्तिमत्वाबद्दल ही गोष्ट खूप काही सांगते.”

बजरंगने पुरूषांच्या 65 किलो गटात अंतिम फेरीत जपानच्या टाकाटानी दाइचीला 11-8 असे पराभूत करत हे सुवर्णपदक पटकवले.

सुवर्णपदक जिंकण्याआधी त्याने या स्पर्धेत उजबेकीस्तानच्या खासानोव सिरोजिद्दीन, ताजीकीस्तानच्या फयझी अब्दुलकोजिम आणि मंगोलियाच्या बटचूलून बॅटमंगइला पराभूत केले होते.

बजरंगचे हे एशियन गेम्समधील दुसरे पदक असून त्याने 2014 ला झालेल्या एशियन गेम्समध्ये 61 किलो वजनी गटात त्याने रौप्यपदक मिळवले होते. तसेच त्याने 2018 च्या गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: कुस्तीपटू दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक

एशियन गेम्स: नेमबाज संजीव राजपूतने भारताला मिळवून दिले आठवे पदक

एशियन गेम्स: सिपॅक टॅकराॅवमध्ये भारताने मिळवले पहिले ऐतिहासिक पदक