एशियन गेम्स: नेमबाज दिपक कुमारला रौप्यपदक

इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये नेमबाज दिपक कुमारने सोमवारी (20 आॅगस्ट) भारताला तिसरे तर नेमबाजीतील दुसरे पदक मिळवून दिले आहे. त्याने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकाराच रौप्य पदकाची कमाई केली आहे.

दिपकने अंतिम फेरीत 247.7 गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले. तर चीनच्या हाओरन यांगने एशियन गेम्समधील विक्रमी 249.1 गुण मिळवत सुवर्णपदक मिळवले.

याच स्पर्धेत भारताच्या रवी कुमारला मात्र चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्याने अंतिम फेरीत 205.2 गुण मिळवले. त्याचबरोबर तैवानच्या शाओशुआन लूला कांस्यपदक मिळाले आहे.

दिपक कुमारने याआधी यावर्षी आयएसएसएफ विश्वचषक 2018 स्पर्धेच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात मेहुली घोषसह मिश्र संघात आणि त्याचबरोबर वयक्तिक गटातही कांस्य पदक पटकावले होते.

तसेच या 30 वर्षीय खेळाडूने 2017ला ब्रिस्बेन येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियशीपमध्येही कांस्यपदक मिळवले होते. 

या विजयानंतर दिपक कुमारला त्याचा मित्र आणि एअर फोर्समधील रुममेट रवीलाही पराभूत केल्यानंतरच्या भावनांविषयी विचारले असता दिपक म्हणाला, “आम्ही नेमबाजी करताना या सगळ्याचा विचार करत नाही. आम्ही चांगले मित्र आहोत. तसेच आम्ही खूप वेळ एकत्र घालवतो पण हा वयक्तिक खेळ आहे.”

त्याचबरोबर दिपकने सांगितले की तो स्पर्धेदरम्यान शांत राहण्याचा प्रयत्न करत होता.

यावर्षीच्या एशियन गेम्समध्ये पहिले पदक रवी कुमार आणि अपूर्वी चंडेला यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात मिश्र संघात खेळताना मिळवून दिले होते. त्यांना स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कांस्यपदक मिळाले आहे.

याबरोबरच दिपक कुमार नंतर काही वेळाने लक्ष्यने सोमवारी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात रौप्य पदक मिळवत भारताला चौथे पदक मिळवून दिले आहे.

यावर्षी भारताला पहिले सुवर्णपदक कुस्तीपटू बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

सचिन-गांगुलीपाठोपाठ मोठ्या खेळाडूचं येतेयं आत्मचरित्र

एशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक

एशियन गेम्स: भारताकडून अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांना नेमबाजीत कांस्यपदक