एशियन गेम्स: कुस्तीपटू दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक

जकार्ता येथे सुरु असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये कुस्तीपटू दिव्या काकरानने मंगळवारी (२१ आॅगस्ट) कांस्यपदक पटकावले. तिने फ्रिस्टाईल ६८ किलो वजनी गटात हे पदक मिळवले आहे.

यावेळी दिव्याने तांत्रिक गुणाच्या आधारावर चायनीज तैपेईच्या चेन वेनलिंगला ९० सेंदकात १०-० ने पराभूत केले. हे कुस्तीमधील भारताचे तिसरे पदक आहे.

तसेच दिव्याने २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक आणि ज्युनियर एशियन चॅम्पियनशीपमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

कालच (२०ऑगस्ट) विनेश फोगटने महिलांच्या ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. तर पुरूषांच्या ६५ किलो वजनी गटात कुस्तीपटू बजरंग पुनियाने सुवर्णपदकाची कामगिरी केली आहे.

भारताला आत्तापर्यंत १० पदके मिळाली असून यात कुस्तीमध्ये तीन, नेमबाजीमध्ये ६ आणि सिपॅक टॅकरावमध्ये १ पदक मिळाले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: नेमबाज संजीव राजपूतने भारताला मिळवून दिले आठवे पदक

एशियन गेम्स: सिपॅक टॅकराॅवमध्ये भारताने मिळवले पहिले ऐतिहासिक पदक