एशियन गेम्समध्ये भारताला जबरदस्त टक्कर देऊ शकणाऱ्या इराण संघाबद्दल सर्वकाही

जागतिक कबड्डीमध्ये इराणने आपल्या कामगिरीच्या जोरावर संपूर्ण कबड्डीविश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. कुस्तीपटूंप्रमाणे क्षमता असणाऱ्या या संघाने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. इराण संघातील अनेक खेळाडूंनी प्रो-कबड्डी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

2018 आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी इराणने आपल्या 12 सदस्यीय पुरूष आणि महिला संघाची घोषणा केली. पुरूष संघातून माजी कर्णधार मिराज शेखला आश्चर्यकारकरीत्या वगळण्यात आले आहे.

त्याआधी त्यांच्या 16 सदस्यीय संघाने भारतातील जयपूर येथे मुख्य प्रशिक्षक घोलामरेजा माझानदारानी आणि सहाय्यक प्रशिक्षक खाराघानी यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला.

2006 साली दोहा, कतार येथे इराण पुरूष संघाने पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा खेळली होती. गटात एकच साखळी सामना जिंकल्याने त्यांना साखळी स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यांनी एकमेव विजय बांग्लादेशविरूद्ध (56-39) मिळवला.

त्यानंतर 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणने रोैप्यपदक पटकावले. त्या स्पर्धेत फझल अत्राचली, अबोझर मिघानी आणि मेसाम अब्बासी यांनी पहिल्यांदाच इराणचे नेतृत्व केले.

त्यांनी दक्षिण कोरियाला (55-20) साखळी सामन्यात तर पाकिस्तानला (17-16) उपांत्य सामन्यात पराभूत केले होते. मात्र अंतिम सामन्यात भारताने त्यांचा 37-20 असा  पराभव केला.

2014 आशियाई क्रीडा स्पर्धेतही इराणने अशाच कामगिरीची पुनरावृत्ती केली. मलेशिया (56-22), दक्षिण कोरिया (41-22) आणि जपान (53-21) यांना हरवून इराणने गटात पहिले स्थान पटकावले.

तसेच पुन्हा एकदा उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा (25-14) पराभव केला. परंतु अंतिम सामन्यात भारताकडून 25-27 असा त्यांचा निसटता पराभव झाला आणि त्यांना पुन्हा राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात अखेरपर्यंत इराणने वर्चस्व ठेवूनही भारताच्या दमदार पुनरागमनामुळे हा गाजला गेला.

इराणच्या महिला संघाने 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. साखळी सामन्यांत त्यांनी चायनीज तैपेई (62-18), मलाशिया (73-10) यांचा पराभव केला. परंतु थायलंडकडून (38-41) त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तसेच उपांत्य सामन्यात भारताने (22-23) असा पराभव केला होता.

2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इराण महिला संघाने गटात जपान (34-23), थायलंड (37-25) आणि चायनीज तैपेई (43-19) यांना हरविले. उपांत्य सामन्यात त्यांनी बांग्लादेशचा (40-15) पराभव केला. अंतिम सामन्यात भारताकडून (21-31) पराभव झाल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

इराणच्या पुरूष संघाने इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही वर्चस्व राखले आहे. कबड्डी विश्वचषक स्पर्धेत (2004, 2007, 2016) त्यांनी दुसरे स्थान मिळवले आहे.

त्यांनी आशियाई बीच कबड्डी स्पर्धेत (2012, 2014) अजिंक्यपद तर आशियाई इनडोअर स्पर्धेत (2009, 2013) राैप्यपदक मिळवले आहे.

दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत प्रमुख खेळाडूंशिवाय मैदानात उतरूनही त्यांनी राैप्यपदक पटकावले आहे.

दक्षिण कोरिया आणि केनिया यांना गटात प्रत्येकी दोन वेळा हरवले. तसेच पाकिस्तानच्या अनुभवी संघाला (40-21) देखील हरवले आहे. एकूणच पाहता इराण सुवर्णपदकासाठी एक प्रबळ दावेदार आहे.

2018 आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी इराण संघ पुढीलप्रमाणे –

पुरूष संघ – फझल अत्राचली (कर्णधार), अबोझर मोहाजेरमिघानी, मोहम्मद इस्माइल नबीबख्क्ष, हादी ओश्त्रोक, अबोलफझल मघसोदलू, हामीद मिर्झाइ नादर, मोहसेन मघसोदलू, मोहम्मद घोर्बानी, मेइसाम अब्बासी, मोहम्मद मालक, मोहम्मदामिन नोसराती, मोहम्मद इस्माइल मघसोदलू

महिला संघ – अझादे सइदी, घझाल खलाज, झारा अब्बासी, फरीदे झारिफदूस्त, मेहबूब सांचूली, सदिघी जफारी, सइदी जफारी, फतिमी करामी, झारा करामी, सामिरा अतारोदिया, रोया दाउदिया, राहिल नादेरी

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

आम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार???

टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट

टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण