…आणि भारताला पराभूत केल्यावर कोरियन खेळाडू, चाहत्यांना अश्रू अनावर

जकार्ता | भारत विरुद्ध कोरिया यांच्यात आज (२० आॅगस्ट) झालेल्या सामन्यात कोरियाने भारताला २४-२३ पराभूत केले. अतिशय अटातटीच्या या सामन्यात गेल्या ५ एशियन गेम्समध्ये एकही सामना पराभूत न झालेल्या टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

शेवटच्या ५० सेकंदात भारताकडे २ रेड बाकी होत्या, परंतु कर्णधार अजय ठाकूरचा बोनस गुण घेतल्याचा मोठा समज झाला. यावेळी टीम इंडियाच्या कर्णधाराने खेळाडूंकडून याची खात्रीही केली नाही. याचा मोठा फटका भारताला बसला. तर शेवटच्या रेडला दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला. यामुळे सामना २४-२३ असा कोरियाने जिंकला.

यानंतर आपण कबड्डीमधील सर्वात मोठ्या संघाला पराभूत केले याचा अंदाज आलेल्या कोरियन खेळाडूंनी मैदानावरच अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. भारतीय संघाला कबड्डीत पराभूत करणे केवळ अशक्य आहे हा समज कोरियन खेळाडूंना एका जबरदस्त सामन्यात खोडून काढला.

यावेळी कोरियन चाहतेदेखील मैदानात आनंदाने रडताना दिसले. काही चाहते हे खेळाडूंसोबत सेल्फी काढताना दिसले.

भारताने काल झालेल्या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेशवर विजय मिळवला होता. तर उद्या संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना थायलंड संघासोबत होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-…तरच टीम इंडिया घडविणार तिसऱ्या कसोटीत इतिहास

-भारतीय महिला कबड्डी संघाचा दुसरा विजय, जाणून घ्या महिला कबड्डीचे दुसऱ्या दिवसाचे सर्व निकाल

एशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक