एशियन गेम्स: भारतीय पुरूष हॉकी संघाच्या अंतिम फेरीच्या आशा संपुष्टात

इंडोनेशियात सुरू असलेल्या 18व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरूष हॉकी संघ उंपात्य सामन्यात मलेशियाकडून पराभूत झाल्याने त्यांच्या सुवर्ण आणि रौप्य पदकांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

या सामन्यात 2-2 असे बरोबरीत असल्यावर पेनाल्टी शूट-आउटमध्ये भारत 6-7 असा पिछाडीवर राहिला. हरमनप्रीत आणि वरून कुमार यांनी भारताकडून सामन्यात हे दोन गोल केले तर मलेशियाकडून फैजल आणि रहिम यांनी गोल केले.

सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाली होती पण रुपिंदर पाल सिगंने या संधीचा फायदा घेतला नाही. 0-0 असे बरोबरीत असताना मलेशियाने ड्रॅग-फ्लिकर शॉट मारला पण भारतीय खेळाडूंनी रिव्ह्यू मागितला की जो भारताच्या बाजूने लागला.

पहिल्या दोन्ही सत्रात 0-0 असे बरोबरीत असताना भारताला 33व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाली ज्याचे हरमनप्रीतने गोलमध्ये रूपांतर केले. तर 40 मिनिटाला मलेशियाच्या फैजलने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. याच मिनिटाला भारताला परत एकदा पेनाल्टी मिळाल्याने वरूण कुमारने याचा फायदा उठवत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

58व्या मिनिटाला मलेशियाला पेनाल्टी मिळाल्याने सामना 2-2 असा बरोबरीत आल्याने त्याचा निकाल पेनाल्टी शूट-आउटने झाला.

यावेळी मलेशिया 7-6 असा आघाडीवर होता तरी भारताला बरोबरी साधण्याची संधी होती पण भारताच्या एस व्ही सुनिलचा सातवा शॉट चुकल्याने भारताचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाने २० वर्षांनंतर केला अंतिम फेरीत प्रवेश

पहिल्याच दिवशी काही मिनीटांत इशांतचा कसोटीत मोठा पराक्रम