एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक

इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला पहिल्यांदाच 4×400 मीटर मिश्र रिले स्पर्धेत रौप्यपदक मिळाले आहे.

मोहम्मद अनास, पुवम्मा मचेत्तीरा, हिमा दास आणि राजीव अरोकिया यांचा या भारतीय संघात समावेश होता. त्यांनी 3 मिनीटे 15.71 सेकंदाची वेळ नोंदवत हे रौप्यपदक जिंकले.

तसेच बहारिन संघाने 3 मिनीटे 11.89 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. तर कझाकस्तानच्या संघाने कांस्यपदक जिंकले. त्यांनी  3 मिनीटे 19.52 सेकंदाची वेळ नोंदवली.

अनासने सुरुवातीला आघाडी घेतली होती. पण पुवम्मा पिछाडीवर पडली. त्यामुळे नंतर हिमाने भारताला आघाडीवर आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. अखेर अरोकियाने भारताचे रौप्यपदक निश्चित केले.

भारतासाठी हा दिवस खास ठरला आहे. भारताने आज 9 पदके जिंकली आहेत. यात 1 सुवर्णपदक, 6 रौप्यपदके आणि 2 कांस्यपदके मिळवली आहेत.

तसेच भारताने रिले शर्यतीआधी पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले आहे. यात मनजीत सिंगने सुवर्णपदक तर जिन्सन जॉन्सनने रौप्यपदक मिळवले आहे.

भारताने आत्तापर्यंत एशियन गेम्स 2018मध्ये अॅथलेटीक्समध्ये 11 पदके मिळवली आहेत. यात 3 सुवर्णपदके, 8 रौप्यपदकांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: ८०० मीटर शर्यतीत भारताची सुवर्ण आणि रौप्य कामगिरी

एशियन गेम्स: युट्युबवरुन गिरवले भालाफेकचे धडे, मिळवले सुवर्णपदक

एशियन गेम्स: भारताच्या महिला, पुरुष संघाना तिरंदाजीत रौप्यपदक