एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाचे दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी संघ अंतिम सामन्यात जपानकडून 1-2 असे पराभूत झाल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

यावेळी दोन्ही संघाने खेळाला आक्रमक सुरूवात केली होती. 10 व्या मिनिटाला गुरजीत कौरने ड्रॅग-फ्लिकर शॉट खेळला पण तो जपानच्या गोलकिपरने अडवला. त्याच्या पुढच्याच मिनिटाला जपानच्या शिमिझूने गोल करत सामना 1-0 असा केला.

दुसऱ्या सत्रात भारताने आक्रमक सुरूवात करत नेहा गोयलने 25 व्या मिनिटाला गोल करत भारताचे खाते उघडले. तर 44व्या मिनिटाला जपानला पेनाल्टी मिळाली याचा फायदा घेत कावामुराने गोल करत सामना 2-1 असा केला.

शेवटच्या सत्रात भारताला गोल करण्याची संधी मिळाली होती पण त्याचा त्यांनी योग्य तो फायदा घेतला नाही.

उपांत्य सामन्यात भारताने तीन वेळचा चॅम्पियन असलेल्या चीन संघाला 1-0 असे पराभूत करत 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच अंतिम गाठली होती.

भारताने 1982ला एशियन गेम्सचे विजेतेपद मिळवले होते. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच सहभाग घेतला होता. तसेच 1998ला बॅंकॉक गेम्समध्ये अंतिम फेरीत पराभूत झाले होते. त्यामुळे भारताचे आता एशियन गेम्समध्ये एकूण सहा पदक झाले आहेत. मागील स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळवले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

एशियन गेम्सचा पाॅकेटमनी सीमा पुनीया देणार केरळमधील महापूर ग्रस्तांना

तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा तो ठरला पहिलाच भारतीय बॉक्सर

भारताचे २०२० आॅलिंम्पिक स्पर्धेतील एक सुवर्णपदक पक्के! जाणुन घ्या का?

एशियन गेम्स: भारताला सेलींग क्रिडा प्रकारात १ रौप्य आणि २ कांस्य पदके