केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी

इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताचा जलतरणपटू साजन प्रकाशने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने रविवारी (19 आॅगस्ट) 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरीत पाचवे स्थान मिळवले.

याबरोबरच तो स्विमिंग स्पर्धेत एशियन गेम्समध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा 32 वर्षांनंतरचा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी कझान सिंग यांनी 1986 ला एशियन गेम्समध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.

साजनने हा पराक्रम केला असला तरी मात्र त्याच्या कुटुंबातील काही सदस्य हे केरळच्या महापूरात अडकले आहेत.

ज्यावेळी साजन ही स्पर्धो खेळत होता त्यावेळी त्याला त्याच्या कुटुंबाच्या परिस्थिती विषयी कोणतीही माहिती नव्हती.

केरळमधील इडुकी जिल्ह्यात साजनचे आजोळ असून तिथेच तो लहानाचा मोठा झाला आहे. या केरळच्या महापूरात साजनचे मामा आणि आजी आडकले होते.

त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. याबद्दल साजनला तमिळनाडूमध्ये असणारी त्याच्या आईने माहीती दिली आहे.

परंतू साजनच्या खेळावर या गोष्टीचा परिणाम होऊ नये म्हणून त्याच्या आईने त्याला त्याचे आजी आणि मामा कुठे आहेत याबद्दल मात्र कोणतीही माहिती दिलेली नाही.

तो म्हणाला, “मला अजूनही माहित नाही की ते कुठे आणि कसे आहेत. मला फक्त ते सुरक्षित ठिकाणी आहेत एवढेच माहित आहे. मी त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे.”

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?

केवळ ६ धावा आणि क्रिकेट जगतातील सर्वात खास विक्रम कोहलीच्या नावे

लारा, ब्रॅडमन, पाॅटींग… सर्वांचे विक्रम किंग कोहलीने मोडले