आशियाई गेम्समध्ये महाराष्ट्राचे हे ४ खेळाडू करणार भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व

-अनिल भोईर

दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने विजेतेपद पटाकवले. कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या आधीपासूनच १८ व्या आशियाई गेम्स स्पर्धेची चर्चा सुरू होती. आशियातील सर्वात मोठा स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी आशियाई क्रीडा स्पर्धे जकार्ता इंडोनेशिया येथे होणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष व महिला कबड्डी संघाची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरांवर कबड्डी मध्ये भारतीय कबड्डीची मक्तेदारी आहे. भारत आतापर्यंत कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पराभूत झालेला नाही.

१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघात नवीन चेहऱ्याना संधी देण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा १९ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान इंडोनेशिया येथे पार पडणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय कबड्डी पुरुष संघात महाराष्ट्राच्या रिशांक देवडिगा व गिरीश इरनक या दोघांनाची तर महिला कबड्डी संघात महाराष्ट्राची एकमेव महिला खेळाडू सायली करिपाळे हिची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याऱ्या तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. त्याचबरोबर मूळची महाराष्ट्राची असलेली पण भारतीय रेल्वे महिला संघाचे प्रतिनिधित्व करणारी सोनाली शिंगटे हिची सुध्या भारतीय महिला संघात निवड झाली आहे.

 रिशांक देवडिगा

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद पटकावून देणारा महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवडिगाची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही रिशांकची दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरणार आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत व फेडरेशन कपमधील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात निवड झाली असून कबड्डी मास्टर्समध्ये ५ सामन्यात २५ गुण मिळवले होते. यास्पर्धेत भारताकडून पहिला सुपरटेन रिशंकने केला होता.

 गिरीश इरनक

कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताला विजेतेपद पटकावून देण्यात मोलाची भूमिका असलेला महाराष्ट्राचा खेळाडू गिरीश इरनकची देखील ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरणार आहे. कबड्डी मास्टर्स स्पर्धेत ५ सामन्यात सर्वाधीक १९ पकडी केल्या. तसेच दोन सामन्यात हाय फाय करण्याच्या विक्रम केला. स्पर्धेत एक सामन्यात सर्वाधिक ७ पकडी करण्याचा विक्रमही त्याचा नावावर केला.

सायली करिपाळे

भारतीय महिला कबड्डी संघात नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून एकमेव महिला खेळाडू सायली करिपाळे हिची भारतीय संघात निवड झाली आहे. सायली करिपाळेची पाहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात खेळताना चांगली कामगिरी केली होती, तसेच फेडरेशन कपमध्ये ३ सामन्यांत चढाईत २४ गुण तर पकडीत ३ गुणांची कमाई करत महाराष्ट्रकडून चांगली कामगिरी बजावली होती.

सोनाली शिंगटे

मुंबई येथे राहणारी पण भारतीय महिला रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करणारी सोनाली शिंगटे हिची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला कबड्डी संघात निवड झाली आहे. भारतीय रेल्वे संघात आपला कामगिरीने चांगला ठसा उमटवला असून फेडरेशन कप पाच सामन्यात चढाईत ३३ गुण मिळवत रेल्वेला विजेतेपद पटकावून देण्यात मोलाची भूमिका होती.

महत्त्वाच्या बातम्या:

-एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाची घोषणा

 -काय सांगता! धोनीवर पुन्हा चित्रपट बनणार?

-Video: एमएस धोनीने शेअर केला वाढदिवसाचा खास व्हिडिओ

-मालिका विजयासाठी भारत आणि इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या निर्णायक सामन्याविषयी सर्वकाही…

-वाढदिवस विशेष- कर्णधारांचा कर्णधार – दादा..

-चेन्नईच्या तीन वर्षीय ज्यूनियर धोनीच्या सिनियर धोनीला कूल शुभेच्छा

-नाराज मुंबई क्रिकेट असोसिएशनने उचलले मोठे पाऊल