एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

18 व्या एशियन गेम्समध्ये सोमवारी(27 आॅगस्ट) महिलाच्या लांब उडीमध्ये भारताच्या नीना वारकिलने रौप्यपदकाची कमाई केली आहे. तिने चौथ्या प्रयत्नात 6.51 मीटरची उडी मारत हे रौप्यपदक जिंकले.

तसेच या स्पर्धेत व्हिएतनामच्या थी थू थाओ बुईने पहिल्या प्रयत्नात 6.55 मीटरची उडी मारत सुवर्णपदक जिंकले. तसेच चीनच्या झिऑलिंग झूने चौथ्या प्रयत्नात 6.50 मीटरची उडी मारत कांस्यपदक मिळवले.

नीनाने या स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात 6.41 मीटर दुसऱ्या प्रयत्नात 6.40 मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात 6.50 मीटरची उडी मारली. त्यानंतर तिने चौथ्या प्रयत्नात 6.51 मीटरची उडी मारत अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले.

तसेच तिने नंतर चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात अनुक्रमे 6.46 मीटर आणि 6.50 मीटरची उडी मारली.

त्याचबरोबर याच स्पर्धेत भारताचीच नयना जेम्स अंतिम फेरीत 10 व्या क्रमांकावर राहिली. तिला सहापैकी फक्त पहिले दोन प्रयत्नच यशस्वी करता आले.

नीनाने याआधी 2017 मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदकाची कमाई केली होती. तसेच यावर्षी गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिला 10 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारताच्या सुधा सिंगने पटकावले स्टिपलचेसमध्ये रौप्यपदक

एशियन गेम्स: निरज चोप्राने भारताला मिळवून दिले भालाफेकीतील पहिले सुवर्णपदक

एशियन गेम्स: धरूण अय्यास्वामीने जिंकले ऐतिहासिक रौप्यपदक