एशियन गेम्स: महाराष्ट्र कन्या राही सरनोबतचा सुवर्णवेध

18 व्या एशियन गेम्समध्ये महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबतने आज (22 आॅगस्ट) भारताला चौथे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तीने हे पदक महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात मिळवून दिले आहे.

एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती भारताची पहिली महिला नेमबाज ठरली आहे.

भारताचे नेमबाजीतील हे दुसरे सुवर्णपदक असून एकूण सातवे पदक आहे. याआधी 21 आॅगस्टला सौरभ चौधरीने नेमबाजीतील पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.

राहीने या स्पर्धेत अंतिम फेरीत 34 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. तर थायलंडच्या नाफास्वान यांगपाइबूनने रौप्यपदक मिळाले. राहीला यांगपाइबूनविरुद्ध संघर्ष करावा लागला होता.

या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी कोरियाची मिनजन्ग किम राहिली असून तिने कांस्यपदक मिळवले. 

तर याच स्पर्धेत पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवलेली मनू भाकर अंतिम फेरीत मात्र सहाव्या स्थानी राहिली. तिने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.

राहीने याआधी 2014 ला झालेल्या एशियन गेम्समध्ये कांस्यपदक मिळवले होते. तर 2010 आणि 2014 च्या राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक आणि 2010 मध्येच  राष्ट्रकूल स्पर्धेत रौप्यपदकही मिळवले होते.

भारताने आत्तापर्यंत 11 पदके मिळाली असून यात कुस्तीमध्ये 3, नेमबाजीमध्ये 7 आणि सिपॅक टॅकरावमध्ये 1 पदक मिळाले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

बुमराह आणि नो बाॅल…टायटॅनिकपेक्षाही भारी लव्हस्टोरी….

इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम

केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी