एशियन गेम्स: समारोप सोहळ्यासाठी हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल असणार ध्वजधारक

इंडोनेशियात पार पडलेल्या एशियन गेम्सच्या समारोप सोहळ्यासाठी भारतीय चमूचा ध्वजधारक म्हणून महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालची  निवड करण्यात आली आहे.

“राणी ही समारोप सोहळ्यासाठी ध्वजधारक असणार आहे”, असे भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले.

राणीच्या नेतृत्वाखाली भारत या स्पर्धेत २० वर्षानंतर अंतिम फेरीत पोहचला होता. पण त्यांना जपानकडून १-२ असा पराभव स्विकाराव लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. तसेच राणीने या स्पर्धेत तीन गोल केले आहेत.

१८ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या १८व्या एशियन गेम्सचा आज (२ सप्टेंबर) शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेत पदतालिकेत भारत आठव्या स्थानावर असून एकूण ६९ पदके पटकावली आहेत. यात १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० कांस्य पदकांचा समावेश आहे.

तसेच भारताने २०१०चा ६५ पदकांचा विक्रमही तोडला आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याची ध्वजधारक म्हणून निवड करण्यात आली होती. २० वर्षीय नीरजने ८८.०६ मीटर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले होते.

भालाफेकीत भारताचे हे दुसरे पदक असून याआधी भारताकडून 1982ला दिल्लीत झालेल्या एशियन गेम्समध्ये गुरतेज सिंगने भालाफेकीतील पहिले पदक मिळवून दिले होते. त्यांनी भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते.

१४व्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदक मिळवले होते. यामध्ये बॉक्सर अमित पांघलने ४९ किलो वजनी गटात आणि ब्रिजमध्ये पुरूष दुहेरीत प्रणब बरधन आणि शिभनाथ सरकार यांनी सुवर्ण पदक जिंकले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

चौथी कसोटी: इंग्लंडचे तळातले फलंदाज ठरले टीम इंडियासाठी डोकेदुखी

रहाणे, एबी आणि सचिनबद्दल रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य

एशियन गेम्स: पाकिस्तानला हरवत भारतीय पुरूष हॉकी संघाने पटकावले कांस्यपदक

एशियन गेम्स: बॉक्सिंगमध्ये अमित पांघलला सुवर्णपदक