एशियन गेम्स: सायना नेहवालचे हे पदक का आहे भारतासाठी खास?

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय बॅटमिंटनपटू सायना नेहवालला कास्यंपदकावर समाधान मानावे लागले. तीला चायनिज तैपईच्या ताइ त्झू यींगकडून १७-२१, १४-२१ असे पराभूत व्हावे लागले.

भारताचे हे एशियन गेम्समधील बॅटमिंटनसाठीचे एकेरीतील दुसरे तर महिलांमधील पहिले पदक ठरले. याआधी १९८२ला भारताकडून पुरूष एकेरीत सईद मोदीने पदक जिंकले होते. यामुळेच सायनाचे हे पदक खास ठरले आहे.

आक्रमक सुरूवात करणाऱ्या यींगने पहिल्याच सेटमध्ये ४-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र सायनाने खेळ उंचावत सेट ८-८ असा बरोबरीत आणला. नंतर यींगने सरळ चार गुण मिळवत पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये सायनाने यींगला चांगली लढत दिली होती. सेट १२-१२ असा बरोबरीत असताना परत एकदा यींगने या सेटमध्येही आघाडी मिळवत आपले वर्चस्व कायम राखले. या पराभवानंतर सायना यींगकडून सलग दहा वेळा पराभूत झाली आहे.

अंतिम फेरीत यींगचा सामना भारतीय बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू हिच्याशी होणार आहे. हा सामना उद्या (२८ ऑगस्ट) आहे.

अशाप्रकारे आत्तापर्यंत भारत पदतालिकेत ३७ पदकांसह नवव्या स्थानावर आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पीव्ही सिंधूने एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत प्रवेश करत रचला इतिहास

“हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था…. “

एशियन गेम्स २०१८: शॉटपुटमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक!