क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोडांच्या व्हायरल फोटोचे सत्य आले बाहेर

केंद्रिय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांचा काही दिवसांपूर्वी इंडोनेशियात सुरु असलेल्या एशियन गेम्समधे सहभागी झालेल्या भारतीय अॅथलिट्सला अन्न वाढत असल्याचा फोटो वायरल झाला होता. परंतू आता त्यामागील सत्य समोर आले आहे.

राठोड त्यावेळी स्वत:चे ताट घेऊन उभे होते आणि त्याच वेळी ते अॅथलिट्सबरोबर एशियन गेम्सच्या व्हिलेजमधील जेवणाच्या ठिकाणी संवादही साधत होता. या संवादानंतर ते जेवणासाठी टेबलवर बसले.

या दरम्यानचे वायरल झालेल्या फोटोचे सत्य विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिग्विजय सिंग राव या पत्रकाराने राठोड यांचे क्रमाने असलेले फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना दिग्विजय सिंग हे म्हटले आहेत की, “नो कमेंट्स. हा फोटोंचा क्रम आहे.”

मात्र तरीही अजून अधिकृतरित्या याबद्दल कोणतीही माहिती आलेली नाही.

राठोड हे माजी आॅलिम्पिक रौप्यपदक विजेते नेमबाज आहेत. तसेच सध्या भारताचे केंद्रिय क्रिडामंत्री आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कोर्टवरच टॉप बदललेल्या अॅलिझ कॉर्नेटची यूएस ओपनला मागावी लागली माफी

एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाने २० वर्षांनंतर केला अंतिम फेरीत प्रवेश

पहिल्याच दिवशी काही मिनीटांत इशांतचा कसोटीत मोठा पराक्रम