एशियन गेम्स: टेबल टेनिस मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक

इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबॅंग येथे सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये टेबल टेनिस मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक मिळाले आहे. उपांत्य सामन्यात मनिका बत्रा आणि अचंता शरथ कमल या भारतीय जोडीला चीनकडून 1-4 असा पराभवाचा सामना करावा लागला.

वॉन्ग सुन आणि यिंगशा सुन या चीनी जोडीने भारतीय जोडीचा 11-9, 11-5, 13-11, 11-4, 11-8 असा पराभव केला.

हे भारताचे एशियन गेम्समधील 51वे पदक ठरले आहे. तर टेबल टेनिसचे हे दुसरे पदक आहे. तब्बल 60 वर्षांनंतर भारताला ही दोन पदके मिळवण्यात यश आले. तर पहिले कांस्य पदक भारतीय पुरूष संघाने मंगळवारी (28 ऑगस्ट) मिळवले होते.

याआधी बत्रा आणि कमल यांनी उपांत्यपूर्व सामन्यात प्रवेश करण्यासाठी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या ली सबग्सु आणि जेऑन जीहीला 11-7, 7-11, 11-8, 10-12, 11-4 ने पराभूत केले होते.

तर उपांत्यपूर्व सामन्यात या भारतीय जोडीने उत्तर कोरियाच्या अन जी सोंग आणि ची हयो सिमला 11-4, 10-12, 11-6, 6-11, 11-8 ने पराभूत केले होते. मात्र उपांत्य सामन्यात त्यांना चीनकडून पराभूत व्हावे लागले.

18 व्या एशियन गेम्समधील पदतालिकेत भारत 51 पदकांसह नवव्या स्थानावर आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक

एशियन गेम्स: डोळे मिटून १००मीटर शर्यत पूर्ण केली

एशियन गेम्स: युट्युबवरुन गिरवले भालाफेकचे धडे, मिळवले सुवर्णपदक