एशियन गेम्स: भारतीय टेनिसपटू अंकिता रैनाने जिंकले कांस्यपदक

इंडोनेशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारताला टेनिसपटू अंकिता रैनाने कांस्यपदक मिळवून दिले. महिलांच्या एकेरीत तिला उपांत्य सामन्यात चीनच्या झेंग शुआईने ६-४, ७-६ असे पराभूत केल्याने तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

पहिल्या सेटमध्ये ३-१ असे पुढे असताना अंकिता खांद्याच्या दुखापतीने मागे राहिली होती. नंतरच्या सेटमध्ये तिला चांगलाच प्रतिकार करावा लागला. तरीही दुसरा सेट ७-६ असा गमवावा लागल्याने तिला सामनाही गमवावा लागला.

२५ वर्षीय अंकिता एशियन गेम्समध्ये पदकाची कामगिरी करणारी आणि एटीपी क्रमवारीत पहिल्या २००मध्ये समावेश असणारी फक्त तिसरी भारतीय टेनिसपटू आहे. तिने आंतराष्ट्रीय टेनिस स्पर्धेमध्ये ६ एकेरी आणि १३ दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहेत.

पुरूष दुहेरीत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि दिविज शरण यांनी जपानच्या कायटो उसेंगी आणि शो शिमाबुकुरोला ४-६, ६-३, १०-८ असे पराभूत करत उपांत्यफेरीत पोहचले आहेत. यामुळे भारताचे रौप्यपदक निश्चित झाले आहे.

अशाप्रकारे भारत १७ पदकांसह नवव्या स्थानावर आहे. यामध्ये ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

ला लीगाच्या संघांचा अमेरिकेत खेळण्यास नकार-

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश