एशियन गेम्स: हिना सिद्धूला नेमबाजीत कांस्यपदक

18 व्या एशियन गेम्समध्ये भारताची अनुभवी नेमबाज हिना सिद्धूने कांस्यपदक मिळवून दिले आहे. तिने शुक्रवारी (24 आॅगस्ट) 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात हे कांस्यपदक मिळवले आहे.

अंतिम फेरीत तीनच नेमबाज राहिलेले असताना हिनाने 10.8 चा जवळजवळ अचूक शॉट मारला होता. पण त्याच्या पुढच्याच शॉटला तिने 9.6 चा शॉट मारल्याने तिच्या सुवर्ण आणि रौप्यपदकाच्या आशा संपुष्टात आल्या.

पात्रता फेरीत मागे पडलेल्या हिनाने नंतर अंतिम फेरीत चांगले पुनरागमन करत तिसरे स्थान मिळवले. अंतिम फेरीत तिने 219.3 गुण मिळवत कांस्यपदक मिळवले आहे.

तसेच चीनच्या व्यॅन्ग क्वियनने 240.3 गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. तर दक्षिण कोरियाच्या किम मिनजन्गने 237.6 गुणांसह रौप्यपदक मिळवले.

सिद्धूला याआधी एशियन गेम्समध्ये 2010 ला रौप्यपदक तर 2014ला कांस्यपदक मिळाले आहे. तसेच गोल्डकोस्ट येथे झालेल्या यावर्षीच्या राष्ट्रकूल स्पर्धेत आणि दिल्लीत झालेल्या 2010 च्या राष्ट्रकूल स्पर्धेत तिला प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळाले होते.

मात्र या स्पर्धेत 16 वर्षीय मनू भाकेरची निराशा झाली आहे. तिला 176.2 गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तिने गोल्डकोस्ट येथे झालेल्या यावर्षीच्या राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

भारताने आत्तापर्यंत नेमबाजीत एशियन गेम्स 2018 मध्ये 9 पदके मिळवली असून यात 2 सुवर्ण 4 रौप्य आणि 3 कांस्यपदाकांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीप्रमाणेच हार्दिक पंड्याही होता सामनावीराचा तितकाच दावेदार

विराट कोहलीमुळे या संघाच्या प्रशिक्षकांना डच्चू?

स्टीव स्मिथच्या त्या दोन जबरदस्त विकेट्स पाहिल्यात का?