तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा तो ठरला पहिलाच भारतीय बॉक्सर

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या विकास क्रिषनला 75 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळाले आहे. या स्पर्धेत भारताचे बॉक्सिंगमधील हे पहिलेच पदक आहे.

बुधवारी ( 29 ऑगस्ट) झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात डोळ्याच्या दुखापतीमुळे विकासला सामना मध्येच सोडावा लागल्याने त्याला सामना न खेळता आज कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. त्याच्या हा उपांत्यपूर्व सामना चीनच्या एरबिके तांग्लातिहॅन विरुद्ध होता.

26 वर्षीय विकास आज (31ऑगस्ट) उपांत्य सामन्यात कझाकस्तानच्या अमानकुल अबिलखानच्या विरुद्ध खेळणार होता.

उपांत्यपूर्व सामना संपल्यावर त्याच्या डोळ्याची सुज वाढली होती. यावेळी त्याने उपचाराला जाण्यापूर्वी भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशकडे शुक्रवारपर्यंत बरे होऊ की नाही याबद्दल शंका व्यक्त केली होती.

तसेच भारतासाठी तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा विकास हा पहिलाच बॉक्सर आहे. त्याने 2010च्या ग्वानझोऊला 60 किलो वजनी गटात सुवर्ण आणि 2014ला इंचेऑनमध्ये झालेल्या स्पर्धेत मिडलवेटमध्ये कांस्य पदक पटकावले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारताला सेलींग क्रिडा प्रकारात १ रौप्य आणि २ कांस्य पदके

टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देणारा प्रशिक्षक होणार आरसीबीचा ‘महागुरू’

आशिया चषक स्पर्धेसाठी नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे?