आशियाई क्रिडा स्पर्धेसाठी 2370 जणांच्या चमूला मानांकन  

इंडोनेशिया येथे 18 आॅगस्ट पासून सुरू होणाऱ्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलम्पिक्स महासंघाने 2370 क्रिडापटू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांच्या संघाला मानांकन दिले आहे.

18 आॅगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान जकार्ता ( इंडोनेशिया ) येथे होणाऱ्या या स्पर्धेत 40 खेळ प्रकारात 462 विविध इव्हेंट्स होणार आहेत.

भारतीय ऑलम्पिक्स महासंघाची नुकतीच दिल्ली येथे बैठक पार पडली.

या बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परीषदेत भारतीय ऑलम्पिक्स महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी ही माहिती दिली.

तसेच बैठकीत ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताच्या कामगीरीचे मुल्यांकन झाले.

त्याचबरोबर भारतीय ऑलंपिक महासंघ 2021 मधे होणाऱ्या युवा ऑलंपिक स्पर्घेचे यजमानपद मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बत्रा यांनी सांगितले.

भारताचा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 906 खेळाडू आणि 273 आधिकाऱ्यांचा मिळून 1179 सदस्य कोटा आहे.

2370 मानांकीत सदस्यामधुन 1179 सदस्यांना जकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडले जाणार आहे.